Home चंद्रपूर Ballarpur@ taluka news बल्लारपुर तालुका भाजपा कोठारी कोर समिती ची बैठक संपन्न...

Ballarpur@ taluka news बल्लारपुर तालुका भाजपा कोठारी कोर समिती ची बैठक संपन्न कोठारी ग्रामपंचायत प्रभारी इंजी. देवेंद्र वाटकर व भाजयुमो बल्लारपुर अध्यक्ष एँड.रंनजय सिंह प्रमुख उपस्थित

179

Ballarpur@ taluka news

•बल्लारपुर तालुका भाजपा कोठारी कोर समिती ची बैठक संपन्न

•कोठारी ग्रामपंचायत प्रभारी इंजी. देवेंद्र वाटकर व भाजयुमो बल्लारपुर अध्यक्ष एँड.रंनजय सिंह प्रमुख उपस्थित

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

बल्लारपुर:चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असुन यातीलच कोठारी ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात आज दि.१७/११/२०२२ रोज गुरुवार ला कोठारी येथे कोर समिती सोबत बैठक संपन्न झाली.ना. सुधीर मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या मागच्या कार्यकाळात अनेक विषय व प्रलंबित प्रश्न मार्गी लागले होते आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.

या चालू कार्यकाळात देखील उर्वरित विषय मार्गी लागेल सोबतच नवीन विकास कामांची एक गंगा या कोठारीत येईल हा विश्वास ठेऊन या बैठकीत संघटनात्मक बांधणी व निवडणूक संदर्भ विषययावर विस्तृत चर्चा करून यावर एकमताने काही विशेष निर्णय घेण्यात आले.

येणाऱ्या निवडणुकीत यश व पक्ष संघटन बळकट करण्याचा दृष्टिकोनातून घेण्यात आले.येणारी ग्रामपंचायत निवडणूकित आपण निश्चितपणे यश संपादन करू असं निर्धार यावेळी समितीने केला.

या बैठकीत बल्लारपूर विधानसभा संघटन मंत्री राम लखीया, कोठारी ग्रामपंचायत प्रभारी इंजि.देवेंद्र वाटकर, भाजयुमो बल्लारपूर अध्यक्ष ऍड.रनंजय सिंह,कोठारी भाजपा अध्यक्ष सुनील फरकडे,माजी पंचायत समिती उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार,भाजपा नेते सर्व सुरेश राजूरकर, नामदेवराव वडगणे,संजय सिडाम, गिरीश तोरे ,संतोष लोनगाडगे भाजपा महिला नेत्या सौ.स्नेहल टिमबडिया ,सौ.शोभा वडगणे उपस्थित होते.