Home चंद्रपूर Chandrapur@ city news विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कॅरियर गाइडेन्स उपयुक्त :आ....

Chandrapur@ city news विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कॅरियर गाइडेन्स उपयुक्त :आ. किशोर जोरगेवार

104

Chandrapur@ city news

⭕ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कॅरियर गाइडेन्स उपयुक्त :आ. किशोर जोरगेवार

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:शिक्षण क्षेत्रात चंद्रपूरचा विद्यार्थी जिल्हाचे नाव लौंकीक करत आहे. यात शिक्षण संस्थांचा ही मोठा वाटा आहे. विद्यार्थांसाठी विविध उपक्रम राबवित शिक्षण संस्थाच्या वतीने विद्यार्थांचे भवितव्य उज्वल करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु असुन किदवाई महाविद्यालय येथे सुरु होत असलेला करिअर गायडन्स उपक्रम विद्यार्थांच्या शैक्षणीक भवितव्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपाद आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

रफी अहमद किदवाई मेमोरियल शिक्षण संस्थेच्या वतीने आमदार जोरगेवार यांच्या सत्कार व सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला किदवाई मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शफीक अहमद, गोंडवाना विद्यापीठाचे सी.ई.ओ. डॉ. अनिल चिताडे, किदवाई मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अलहाज हैदर, सचिव अधिवक्ता मोहम्मद इकबाल, सहसचिव शानेअली, कार्यकारी सदस्य अधिवक्ता अब्दुल सत्तार, जहीरुद्दीन काझी, मकसूद अहमद, मजीद खान, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्यांक शहर युथ अध्यक्ष राशीद हुसेन, महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद सादिक, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ .नियाज कुरेशी, प्रायमरिचे मुख्याध्यापक अलियार खान, अजय जयस्वाल, वि.मा.शि. चे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, गजानन गावंडे, माजी नगर सेवक बलराम डोडानी, नंदू नागरकर, पर्यवेक्षक मोहम्मद उस्मान आदींची उपस्थिती होती.

रफि अहमद किदवाई मेमोरियल शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाने येथील विद्यार्थांच्या कलागुणांन सादरीकरनासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. संस्थेच्या वतीने सुसज्ज लॅब तयार करण्याची इच्छा प्रकट करण्यात आली होती. यासाठी आपण संस्थेला पाच लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतुन येथील विद्यार्थांना सुसज्ज लॅब उपलब्ध झाली आहे. विद्यार्थांना येत असलेल्या शैक्षणीक अडचणी सोडविण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरु आहे. खाजगी अभ्यासिकेचे दर अधिक आहे. त्यामुळे सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थांना तेथे अभ्यास करणे कठीण आहे. हा गंभीर विषय आहे. त्यामुळे विधानसभा क्षेत्रात 11 अभ्यासिका तयार करण्याचा निर्धार आपण केला आहे. यातील 6 अभ्यासिकेच्या कामाला सुरुवात झाली आहे. तयार होत असलेल्या या

सुसज्ज अभ्यासिकांमध्ये विद्यार्थांना निशुल्क अभ्यास करता येईल असे आ.जोरगेवार यावेळी म्हणाले.
रफि अहमद किदवाई मेमोरियल शिक्षण संस्थेचे काम उत्तम आहे. येथे विद्यार्थांना शिक्षणासह खेळ, कला क्षेत्राबाबतही अवगत केल्या जात आहे. त्यांच्या वतीने आज करण्यात आलेला माझा सत्कार सामाजीक क्षेत्रात आणखी भरीव काम करण्याची ऊर्जा देणारा असल्याचे ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आमदार जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.