Home Breaking News Chandrapur@city news गोमाता वन उद्यानाच्या निर्मिती साठी पुढाकार ध्या माजी खा....

Chandrapur@city news गोमाता वन उद्यानाच्या निर्मिती साठी पुढाकार ध्या माजी खा. नरेश पुगलिया यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

249

Chandrapur@ city news

■ गोमाता वन उद्यानाच्या निर्मिती साठी पुढाकार ध्या

■ माजी खा. नरेश पुगलिया यांचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

चंद्रपुर:जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान दोन नेत्यांमधील जिल्ह्यातील विकासाचा दृष्टिकोनातून ज्वलंत समस्यावर चर्चा झाली या चर्चा मध्ये काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया वनमंत्री व पालकमंत्री सुधिर मुनगंटिवार यांना निवेदन देऊन मांगनी केली. महाराष्ट्रामध्ये १० वर्षावरील गौरक्षण ज्या संस्था आहेत आणि ज्यांच्या गौरक्षण संस्थेमध्ये शेकडो गाई आहेत, अशा गौरक्षण संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने ज्या गौरक्षण संस्थामध्ये १०० गाई आहेत त्यांना १० एकर वन जमीन, ५०० गाई असेल तर ५० एकर वन जमीन व १००० गाई असेल तर १०० एकर वन जमीन या प्रमाणात गौ पालनासाठी वनविभागाने द्याव्यात.
चंद्रपूर जिल्हयातील राजूरा येथील ३० एकर जागेवर वन उद्यान निर्माण केले असून या संकलपनेतून जमीनीची मालकी वन खात्याचीच आहे. परंतु आमदार किंवा खासदार फंडातून, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व शासनाच्या इतर योजनातून राजूरा येथील हे वन उद्यान मोठ्या डौलाने उभे झाले आहे. सन २००२ पासून राजूरा शहरातील जनतेसाठी उपलब्ध असून शहरातील ज्येष्ठ नागरीक व इतरांना मार्निंग -वॉक व इव्हिनिंग वॉक करिता उपलब्ध असून त्यामध्ये खेळांचे साहित्य, वाकिंग ट्रॅक, स्ट्रीट लाईट व प्रसाधन गृह उपलब्ध आहेत आणि दरवर्षी वृक्षरोपणाच्या माध्यमातून इतर जातीची झाडे, फुलांची व फळाची झाडे लावण्यात येत असून त्यांचे संवर्धनही करण्यात येत आहे.
याच धर्तीवर गोमाता वन उद्यानाकरीता जवाबदारीने चालत असलेल्या गौरक्षण संस्थांना वन जमीन उपयोगाकरीता उपलब्ध करून दिल्यास गोमातांना लागणारा चारा, पाणी व स्वास घेण्याकरीता मोकळी जागा या उद्यानाच्या माध्यमातून राज्यात उपलब्ध केल्यास त्यावर उपलब्ध असलेली झाडे व जमीनीला कुंपन केल्यावर आतून सागवानाची व इतर वन उपजांची झाडे लावणे बंधनकारक राहील. या झाडांची मालकी व जमीनीची मालकी वन खात्याची राहील. या जागेमध्ये कुंपन, शेड, टुयूबवेल / खुली विहीर व वीज पुरवठा (इलेक्ट्रीक कनेक्शन), संस्थेला करण्याची परवानगी देण्यात यावी. या निमित्याने जंगलातील पडीत जागा किंवा झुडपी जंगलाची जागा (D-Graded Forest Land) याचा योग्य उपयोग होईल. तसेच गोमातेला लागणा-या चा-याची, पाण्याची व फिरण्यासाठी मोकळ्या जागेचा योग्य उपयोग होईल आणि राज्यातील लाखो गोधनाला संरक्षण मिळेल व त्यांची उपजिवीका व जोपासना होईल गायीच्या दुधाचा व मलमुत्राचा योग्य उपयोग होईल.
तरी महाराष्ट्रातील वन विभागाने वरील सुचनेचा गांभिर्याने सकारात्मक विचार करून ही योजना अमलात आणावी जेणेकरून आज गोमातेची भूकेनी होणारी उपासमार व छळ थांबवता येईल. याची सुरवात महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर जिल्हयाचे असल्यामुळे ते वन उद्यानाप्रमाणे “गोमाता वन उद्यानाची सुरवात चंद्रपूर जिल्हातून करतील, अशी माहिती माजी खासदार यानी दिली.