Home Breaking News Chandrapur@ city news विदर्भ किसान मजदूर कांग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भारतरत्न...

Chandrapur@ city news विदर्भ किसान मजदूर कांग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन केले

268

Chandrapur@ city news

● विदर्भ किसान मजदूर कांग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन केले

सुवर्ण भारत:ग्यानिवंत गेडाम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

चंद्रपुर: (दिनांक ६ डिसेंबर २०२२)
भारतीय संविधानाचे शिल्पकार, बंधुता आणि सामाजिक समता व न्यायाचे पुरस्कर्ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्य आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  नरेश पुगलिया यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी महासचिव  राहूल पुगलिया यांच्या नेतृत्वात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
चंद्रपूर येथील मुख्य मार्गावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात संपन्न झालेल्या या आदरांजली कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्वप्रथम   राहुल पुगलिया यांनी पुष्पचक्र अर्पण करून तसेच उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अतिशय विनम्रभावे बाबासाहेबांना आदरांजली वाहीली.

याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष  गजाननराव गावडे, शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेद्र बेले, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, कामगार नेते वसंत मांढरे, इंटकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, चंद्रपूर नगरपरीषदेचे माजी नगरसेवक विनोद पिंपळशेडे, श्रीमती रत्नमालाताई बावणे, कामगार युनियनचे तारसिंग कल्सी, रामदास वान्दरकर, क्रिष्णन नायर, विरेंद्र आर्य, अनिल तुंगीडवार, सुभाष माथनकर, गजानन दिवसे, युवक काँग्रेसचे दुर्गेश चौबे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जॉन चालूरकर, कॉंग्रेसचे अनंता हुड, अजय महाडोळे, पृथ्वी जंगम, अस्लमभाई, बाबूलाल करुणाकर, सायरा बानो, सुनिल बावने, हेमंत आक्केवार, सुदर्शन पुल्ली, आशिष मोहता, राजेश शुक्ला, सुनिल बकाली, विनोद महतो, यादव शंभरकर, मोहम्मद फरीद, दिवाकर झाडे, उमेश कोलावार, अदूल जमिल, सतिश येझलपूरे, गजेंद सिंग, मनोज बावसकर, प्रशांत घाटे, महेश वाटेकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.