Home Breaking News Chandrapur @taluka news राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे महापरिनिर्वाणदिनी परमपूज्य, महामानवास...

Chandrapur @taluka news राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे महापरिनिर्वाणदिनी परमपूज्य, महामानवास अभिवादन

186

Chandrapur @taluka news

राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे

महापरिनिर्वाणदिनी परमपूज्य, महामानवास अभिवादन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहजिल्हा प्रतिनिधि,चंद्रपुर

घुग्घुस (भोयगांव) स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे ज्येष्ठ शिक्षक बी. झेड. निखाडे यांचे अध्यक्षतेखाली महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, डी. डी. ठाकरे, जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, कु. एस. एन. गाडगे, डी. टी. पानघाटे (वरिष्ठ लिपिक) श्रीमती सुरेखा पिपळशेंडे, डी. आर. चिने उपस्थीत होते.

भारतरत्न,महामानव,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, मेणबत्ती प्रज्वलित अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन एम. ए. अरके यांनी केले. याप्रसंगी प्रथमेश माहुरे, कु. संघर्षा भगत , साहील गेडाम, कु. वैष्णवी लोंढे कु. मानसी वरारकर आर्यन आत्राम, तुषार गोहणे या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

याप्रसंगी लांडे सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आर्थिक तांत्रिक व जैविक आक्रमणा पासून समाज, देश व जगाचे रक्षण करणे हीच खरी महामानवाला आदरांजली ठरेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निखाडे सर यांनी ज्ञानाचे व वाचनाचे महत्व सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही. टी. वैद्य तर आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.