Home Breaking News Ballarpur taluka@ news कोठारीत डॉ. आंबेडकर पुतळ्याचे थाटात अनावरण दहा...

Ballarpur taluka@ news कोठारीत डॉ. आंबेडकर पुतळ्याचे थाटात अनावरण दहा हजार आंबेडकरी अनुयायी ठरले साक्षीदार

84

Ballarpur taluka@ news

■ कोठारीत डॉ. आंबेडकर पुतळ्याचे थाटात अनावरण

■ दहा हजार आंबेडकरी अनुयायी ठरले साक्षीदार.

सुवर्ण भारत:पारीश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपुर (कोठारी) : कोठारी परिसरात कधी नव्हे तो प्रदीर्घ कालावधीनंतर महामानव, घटनाकार बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांचा पुतळा स्थापित करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरातील संविधान चौकात स्थापित पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमासाठी डॉ. राजरत्न आंबेडकर व भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई विशेष उपस्थिती लाभली.

सदर अनावरण व लोकार्पण सोहळ्यात दहा हजार बुद्ध, आंबेडकर अनुयायी हजेरी लावून सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
त्रिपिठक बौद्ध विहार ते नवनिर्मित पुतळ्या पर्यंत विशाल रॅलीने कोठारी वासी दैदिप्यमान झाले. रैलीमध्ये चंद्रपूर येथील भिम विरांगना व पुत्रांनी ढोल-ताशांच्या गजरात जनतेला आकर्षित केले.

त्याच ढोल ताशांच्या तालावर स्थानिक मुलिंच्या लेझीम पथकाने ताल धरला. घोळ्यावर सम्राट अशोक व छत्रपती शिवाजी महाराज हि वेशभूषा आकर्षित ठरली.

याचसोबत पारंपारिक आदिवासी नृत्याने व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळीनी मंत्रमुग्ध करीत रॅलीचे आकर्षण वाढविले. लहान मुलांनी तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, वेशभूषेत साकार केलेले दृश्य प्रेरणादायी ठरेले.

यानंतर पुतळ्याचे अनावरण भदन्त आर्य नागार्जुन सुरई संसाई आणि डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तहसीलदार के. डी. मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली अनावरण व लोकार्पण करण्यात आले. मंचावर दि. बुद्धिस्ट सोसायटी चे जिल्हा अध्यक्ष कैलाश ढेंगडे, सेवानिवृत्त सैनिक वेनुदास खोब्रागडे, समाज अध्यक्ष राजकुमार ट्रेकर, पतळा समिती अध्यक्ष बाबूराव खोब्रागडे व भिकू संघाची उपस्थिती होती.

या सोहळ्यात कोठारी परिसरासह गोंडपिपरी, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर, राजूरा तालूक्यातील दहा हजार बुद्ध, आंबेडकरी अनुयायी सहभागी होवून सोहळ्याचे साक्षीदार झाले. दान दात्यांनी उपस्थित जनसमुदायासाठी मसाला भात, पुरीभाजी, लाडू बुंदी, जिलेबी वाटप केले. कार्यक्रमासाठी बौद्ध समाज, पुतळा समिती, महिला समिती, युवकांनी मेहनत घेत सोहळा पार पडला.