Home Breaking News Visapur gram Panchayat@ news अबब! गाईडच्या भरतीसाठी तिथे उसळली तुंबळ गर्दी....

Visapur gram Panchayat@ news अबब! गाईडच्या भरतीसाठी तिथे उसळली तुंबळ गर्दी. पहिल्या टप्यातील निवडी बाबत अनेक युवा होते अनभीज्ञ पूर्वीच्या पहिल्या टप्प्यात मर्जीतील युवकांची निवड केल्याचा शिवसेना व वंचित ने केला आरोप.

90

Visapur gram Panchayat@ news

● अबब! गाईडच्या भरतीसाठी तिथे उसळली तुंबळ गर्दी.

● पहिल्या टप्यातील निवडी बाबत अनेक युवा होते अनभीज्ञ

● पूर्वीच्या पहिल्या टप्प्यात मर्जीतील युवकांची निवड केल्याचा शिवसेना व वंचित ने केला आरोप.

सुवर्ण भारत: पारीश मेश्राम
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाच्या हद्दीतील जागतिक दर्जाचा असलेला नवनिर्मित श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) विसापूरचे येत्या २५ डिसेंबरला लोकार्पण करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे तिथे पर्यटकांना जैव विविधता असलेल्या वनस्पतींची माहीत देण्यासाठी प्रशिक्षित गाईडांची आवश्यकता आहे.

त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्याने रोजगार मिळावा या हेतूने विसापूर,नांदगाव,भिवकुंड, बल्लारशाह गरजू उत्सुक बेरोजगार उमेदवारास मार्गदर्शक गाईडचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात ७ डिसेंबर बुधवारला उद्यानामध्ये (बॉटनिकल गार्डन) सकाळी १०-०० वा. पासून वन विभागाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या त्याकरीता उद्यानामध्ये स्थानिक तरुणाची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यावर नियंत्रन ठेवण्यासाठी वन विभागाला चांगलीच कसरत करावी लागली.
पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण मुलाखतीची माहितीचा वन विभागाने पाहिजे तसा प्रचार प्रसार केला नसल्याने स्थानिक
तरुणांना त्या पासून मुकावे लागल्यामुळे त्यांच्या मध्ये वन विभाग बाबत कमालाची नाराजगी दिसून येत होती. परंतु दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण मुलाखतीची माहिती स्थानिक लोकप्रशासनाला, ग्रामपंचायतीला दिल्याने व त्यानी त्याची चांगली प्रसिद्धी केल्याने या दुसऱ्या टप्प्याच्या गाईड प्रशिक्षण मुलाखतीला बहुसंख्य युवा बेरोजगारांची प्रचंड गर्दी उसळली होती.
पहिल्या टप्प्यात वन विभागाने जवळपास २६ प्रशिक्षकांची निवड केली होती. परंतु त्या बाबत वन विभागाने परिसरातील स्थानिक लोकप्रशासनाला माहिती दिली नव्हती व पाहिजे तसा त्या प्रशिक्षणाचा प्रचार प्रसार झाला नव्हता अनेक तरुण तरुणीनां त्या पासून वंचित राहावे लागले. त्यामुळे विसापूर गावातील तरुणांमध्ये वन विभागाबाबत नाराजीचा सूर दिसून येत होता तसेच त्या गाईड प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना राजकीय पुढार्‍यांच्या मर्जीतीलच ठराविक लोकांची निवड करण्यात आली असा आरोप शिवसेना तालुका समन्वयक बल्लारपूर प्रदीप गेडाम व वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी केला होता व याबाबत वरिष्ठ उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग,चंद्रपूर श्वेता बोडडू यांना भेटून ती पूर्वीची प्रशिक्षणार्थ्यांची निवड रद्द करण्यात यावी व दुसऱ्या टप्प्यातील निवड निष्पक्ष व्हावी अशी मागणी केली.