Home Breaking News गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर यांना “पाॅवरफूल वुमन” पुरस्कार बहाल!

गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर यांना “पाॅवरफूल वुमन” पुरस्कार बहाल!

118

गडचिरोलीच्या अधिवक्ता कविता मोहरकर यांना “पाॅवरफूल वुमन” पुरस्कार बहाल!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

उपराजधानी नागपूरच्या रामदास पेठ येथील हाॅटेल तुलीतुली इंपेरियल येथे नवभारतच्या वतीने वुमन समीट२०२२चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्रातील अनेक नामवंत पुरस्कार विजेत्या या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या.आरंभी महिलांच्या अडी अडचणी व समस्यांवर साधक बाधक चर्चा झाली.सदरहु कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते मराठी सिने अभिनेत्री किशोरी शहाणे!या आयोजित कार्यक्रमाला डिव्हीजनल कमिश्नर विजयालक्ष्मी विदारी ,जांईट कमिश्नर ऑफ पोलिस अस्वनी दोरजे ,ऍम्सच्या विभा दत्ता ,अॅडिशनल कलेक्टर आशा पठाण आदीं उपस्थित होत्या .

कार्यक्रमात या वेळी महिलांचा सन्मान करण्यात आला.दरम्यान विदर्भाच्या गडचिरोली येथील मिसेस युनिव्हर्स साऊथ पॅसिफिक एशिया अधिवक्ता कविता मोहरकर यांना सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांचे हस्ते पावरफुल वुमन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक व सांस्कृतिक श्रेत्रात आज पावेतो अधिवक्ता कविता मोहरकर यांचे योगदान मोलाचे ठरले आहे .मोहरकर यांना उपरोक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे, कवयित्री स्मिता बांडगे,विजया भांगे ,सरोज हिवरे, मंथना नन्नावरे,मुग्धा खांडे रंजना मोडक , वर्षा शेंडे , साधू राणी , सविता भोयर , रजनी रणदिवे, किरण साळवी , शारदा झाडे , विजया तत्वादी, शारदा मेश्राम आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.