Home Breaking News chandrapur dist @news २०० युनिट वीज मोफत देण्याच्या मागणी साठी आ....

chandrapur dist @news २०० युनिट वीज मोफत देण्याच्या मागणी साठी आ. किशोर जोरगेवार यांचे नेतृत्वात विराट अधिकार बाईक रॅली धडकणार नागपूर विधानभवनावर !

382

chandrapur dist @news

■ २०० युनिट वीज मोफत देण्याच्या मागणी साठी आ. किशोर जोरगेवार यांचे नेतृत्वात विराट अधिकार बाईक रॅली धडकणार नागपूर विधानभवनावर !

सुवर्ण भारत: किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील 200 युनिट वीज मोफत द्या या प्रमुख मागणीसाठी 26 डिसेंबरला सोमवारी यंग चांदा ब्रिगेडची बाईक रॅली अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथील विधान भवनावर धडकणार आहे. सकाळी 7 वाजता स्थानिक गांधी चौकातुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. या बाबतची पुर्व नियोजन आढावा बैठक येथील जनसंपर्क कार्यालयात नुकतीच पार पडली . यात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्याला वीज उत्पादक जिल्ह्याचा विशेष दर्जा देत येथील नागरिकांना घुरगुती वापरातील 200 युनिट वीज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात वीज देण्यात यावी अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे. सदरहु मागणीच्या पुर्ततेसाठी त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. विधानसभा निवडणुकी नंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी हा विषय सभागृहात मांडला होता. त्यानंतर संबंधित मंत्र्यासोबतही त्यांचा पाठपुरावा सतत सुरु आहे.

उपरोक्त मागणीसाठीच आता आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर विधानभवनावर भव्य अधिकारी बाईक रॅली काढण्यात येत आहे. सोमवारी सकाळी सात वाजता गांधी चौकातुन सदर रॅलीला सुरवात होणार आहे. या रॅलीत चंद्रपूर सह जिल्ह्याभरातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. सदरहु रॅली नागपूर येथील विधान भवनावर पोहचल्या नंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असुन आपल्या मागणीचे ते एक निवेदन सादर करणार आहे. याबाबत आमदार जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुर्व नियोजन आढावा बैठक सपंन्न झाली असुन या बैठकीत सदर रॅलीबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.