Home Breaking News Chandrapur city@ news अवघ्या दोन तासांच्या ध्यान आकर्षण आंदोलनाने बसस्थानक शेजारी...

Chandrapur city@ news अवघ्या दोन तासांच्या ध्यान आकर्षण आंदोलनाने बसस्थानक शेजारी असलेल्या रस्त्यावरील वाहने झटपट हटली ! पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल ! ‌ ‌ चंद्रपूर स्री शक्ती महिला आघाडीच्या अभिनव आंदोलनाने सर्वांचेंच लक्ष वेधले

108

Chandrapur city@ news

■ अवघ्या दोन तासांच्या ध्यान आकर्षण आंदोलनाने बसस्थानक शेजारी असलेल्या रस्त्यावरील वाहने झटपट हटली !

■ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल ! ‌ ‌

■ चंद्रपूर स्री शक्ती महिला आघाडीच्या अभिनव आंदोलनाने सर्वांचेंच लक्ष वेधले

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर : रामनगर पोलिस स्टेशनच्या हाकेवर असलेल्या शहरातील बसस्थानक येथील रस्त्यावर नित्य उभी राहणारी अवैध वाहने जलद गतीने हटवा व चंद्रपूर उडान पूलावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या स्री शक्ती महिला आघाडीच्या वतीने चंद्रपूरात आज मंगळवार दि.२७डिसेंबरला सकाळी १०वाजता दोन तासांचे ध्यान आकर्षण आंदोलन करण्यात आले .

हे आंदोलन प्रियदर्शनी चौक व बसस्थानक परिसरात करण्यात आले. रस्त्यावरील उभी असणा-या वाहनांमूळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. तदवतचं उडान पूलावर असंख्य खड्डे पडले असून ते अपघाताला एकप्रकारे आमंत्रण देत आहे . त्यामुळेच आज ध्यान आकर्षण आंदोलन करावे लागल्याची प्रतिक्रिया स्री शक्ती महिला आघाडीच्या अध्यक्षा शिल्पा सुहास कांबळे यांनी आजच्या या आंदोलन दरम्यान या प्रतिनिधीशी बोलताना दिली.उपरोक्त अभिनव आंदोलनात या आघाडीच्या पदाधिकारी व महिला सदस्या सहभागी झालेल्या होत्या.

त्यांनी सदरहु आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाला या अगोदरच एक निवेदन सादर केले होते . प्रशासनाने खड्डे बूजविण्याची कार्यवाही तातडीने न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सदरहु आघाडीच्या अध्यक्षा शिल्पा कांबळे यांनी आज बोलताना दिला आहे.विशेष म्हणजे आज शांतीपूर्वक झालेल्या या अभिनव आंदोलनाने चंद्रपूर करांचे लक्ष वेधले होते .