Home कृषी Chandrapur city@ news चंद्रपूरच्या जनतेला 200 युनिट वीज मोफत द्या- या...

Chandrapur city@ news चंद्रपूरच्या जनतेला 200 युनिट वीज मोफत द्या- या मागणीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण संघर्ष करणार : आ. किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडची अभूतपूर्व अधिकार बाईक रॅली, विधानभवनावर धडकली!

97

Chandrapur city @ news

■ चंद्रपूरच्या जनतेला 200 युनिट वीज मोफत द्या- या मागणीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत आपण संघर्ष करणार : आ. किशोर जोरगेवार

■ यंग चांदा ब्रिगेडची अभूतपूर्व अधिकार बाईक रॅली, विधानभवनावर धडकली!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर : चंद्रपूर करांना 200 युनिट वीज मोफत देण्यात यावे ही मागणी मी विसरलेलो नाही. कारण ही केवळ मागणी नसुन तो आमचा हक्क आहे. हक्कासाठी झालेला उठाव इतिहास घडवतो. आजची ही अधिकार बाईक रॅली चंद्रपूरच्या आंदोलनाच्या इतिहासात नोंदविली जाणार आहे. या मागणीसाठी जिवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची माझी तयारी आहे यासाठी मी जेव्हा जेव्हा हाक देईल तेव्हा या आंदोलनात आपण असेच उत्स्फुर्तंपणे एकत्रित या असे आवाहन चंद्रपूरचे विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक तथा अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी आज उपराजधानी नागपूरात रैलीला संबोधित करताना केले.

चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतकऱ्यांना वीज मोफत देण्यात यावी, रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर भव्य अधिकार बाईक रॅली काढण्यात आली. आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई (अम्मा) यांनी सदरहु रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर ही भव्य अधिकार बाईक रॅली नागपूरच्या दिशेने रवाना झाली.

या विराट बाॅईक रॅलीत माजी नगरसेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सवचे अध्यक्ष अजय जयस्वाल, एमआयडीसी असोसिएशन अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, छोटा नागपूरचे उपसरपंच रिषभ दुपारे,प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, नानाजी नंदनवार, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, आदीं उपस्थित होते.

राज्यात सर्वाधिक वीज उत्पादन करणाऱ्या जिल्हांमध्ये चंद्रपूर जिल्हाचा समावेश आहे. जवळपास 5 हजार मेगावॅट पेक्षा अधिक वीज आम्ही निर्माण करतो. ही औष्णिक वीज आहे. त्यामुळे यातुन होणारे प्रदुषण प्राणघातक आहे. शेतीला याचे मोठे नुकसान होत आहे. प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे वयोमान 5 ते 10 वर्षांनी घटले जात आहे. या औष्णिक विज प्रकल्पातुन होणाऱ्या प्रदुषणाची इतकी मोठी किंमत मोजत असतांनाही केवळ दोन ते अडिच रुपये प्रति युनिट रुपयात तयार होणारी विज आम्हाला 5 ते 15 रुपये प्रति युनिट या दरात विकत घ्यावी लागत आहे. जागा, पाणी, कोळसा, आमचाच मग वीजही आम्ही महाग घ्यायची का? हा अन्याय आहे. या विरुध्द आम्ही पुर्ण ताकदीने संघटित होऊन लढणार असल्याचे आ.जोरगेवार म्हणाले.

या मागणीसाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. जेथे कायदे बनतात अशा अधिवेशनातही आपण हा विषय वारंवार मांडला आहे. संबंधित मंत्र्यांना सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र याला यश येत नसल्याने चंद्रपूरकरांची भावना संपुर्ण मंत्रीमंडळा पर्यंत पोहचावी यासाठी आपण आज ही बाॅईक रॅली नागपूर हिवाळी अधिवेशन सुरु असतांना विधान भवनावर आणली असल्याचे बोलतांना जोरगेवार म्हणाले. या बाॅईक रॅलीत सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिल्या बदल त्यांनी यावेळी चंद्रपूरकरांचेही आभार मानले.

सकाळी 9 वाजता गांधी चौकातुन या रॅलीला आरंभ झाला यावेळी लक्ष्मीनारायण मंदिर येथे रॅलीचे प्रथम स्वागत करण्यात आले. पुढे भद्रावती येथे रवी शिंदे यांनी रॅलीचे स्वागत केले तर वरोरा येथे राहुल जानवे आणि नितीन मत्ते यांनी रॅलीचे स्वागत केले, टेंभूर्डा येथे गावकऱ्यांनी सदरहु रॅलीचे भव्य स्वागत करत आपले समर्थन दर्शविले. रॅली नागपूर येथे पोहचल्या नंतर रॅली पायदळ यशवंत मैदानावर पोहोचली येथे या रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्ह्याला 200 युनिट वीज मोफत द्या या मागणीचे एक निवेदन दिले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी आज सपत्नीक दुचाकीने चंद्रपूर ते नागपूर प्रवास केला.रॅली दरम्यान आमदार जोरगेवार यांनी स्वतः दुचाकी चालवत चंद्रपूर ते नागपूर प्रवास केला. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या अर्धांगिनी कल्याणी जोरगेवार ह्या सोबत होत्या.खुद्द आ.किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक दुचाकी चालवत रॅलीत सहभागी झाले त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक द्विगुणीत झाला होता.