Home Breaking News Vardha district@news नर्सिगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या. समता सैनिक दल महिला संघटनेची...

Vardha district@news नर्सिगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या. समता सैनिक दल महिला संघटनेची मागणी

826

Vardha district@news

नर्सिगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या. समता सैनिक दल महिला संघटनेची मागणी

सुवर्ण भारत:अर्पित वाहने
उपजिल्हा प्रतिनिधी, वर्धा

वर्धा:शालोम नर्सिंग, डॉ. के.बी.हेडगेवार, चेतना नर्सिंग काँलेज, शिवाजी नर्सिंग,यांना मान्यता नसतांना संस्थाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करून त्यांचे पैसे आणि ओरिजीनल कागदपत्रे परत करण्याबाबत समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिट महिला विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी वर्धा,पोलीस अधीक्षक वर्धा,समाज कल्याण अधिकारी वर्धा यांना निवेदन सादर करण्यात आले . mns ची काँलेजला परवानगी नसल्यामुळे या काँलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या मार्गावर आहे.

संस्थाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती न देता विद्यार्थ्यांकडून पैसे घेतलेले आहेत.पैशासाठी विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे क्लासेस सुध्दा घेतल्या जात नाहीत.GNMचे first year चे क्लासेस सुद्धा झालेले नाहीत.क्लासेस न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे वर्षेही वाया जाऊ शकते.

या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. संस्थालकांनी त्याचे पैसे व ओरीजनल डॉक्युमेनट्स परत करावे असे विद्यार्थीचे म्हणणे आहे. यात संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या विधवा महिला, काम करून,लोन घेऊन शिकणारे व सर्व मध्यम वर्गातील असल्याने त्यांना किरायाणे रूम करून रहाणे परवडणारे नाही.

तरी आपण ताबडतोब चौकशी करून, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही अपेक्षा. न्याय न मिळाल्यास समता सैनिक दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही यांवेळी देण्यात आला. यावेळी निवेदन देताना समता सैनिक दल महिला विभागाच्या मार्शल प्रितीताई आष्टेकर,रमाई नगर सिंदी(मेघे)संघटिका वंदनाताई वासनिक,जिल्हा सुरक्षा प्रमुख प्रदिप कांबळे,मार्शल पप्पू पाटील,मार्शल सायली वासनिक ,चंदू भगत अमोल ताकसांडे, रोशन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.