Home Breaking News Korpna taluka@ news रेती तस्करांची मूजोरी कायम; कोरपना महसूल पथकाने पकडलेले...

Korpna taluka@ news रेती तस्करांची मूजोरी कायम; कोरपना महसूल पथकाने पकडलेले ट्रॅक्टर अंधाराचा फायदा घेवून चालक फरार ! पटवारी विशाल कोसनकरची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल !

337

Korpna taluka@ news

रेती तस्करांची मूजोरी कायम; कोरपना महसूल पथकाने पकडलेले ट्रॅक्टर अंधाराचा फायदा घेवून चालक फरार !

पटवारी विशाल कोसनकरची पोलिस स्टेशनला तक्रार दाखल !

सुवर्ण भारत:किरण घाटे
विशेष प्रतिनिधी

कोरपना:चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांवर अंकुश लावण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना महसूल पथक तयार करण्यास सुचना दिल्या आहे.त्या अनुषंगाने कोरपना तालुक्यात ही हे महसूल पथक कार्यरत आहे. दरम्यान याच तालुक्यात महसूल पथकाने गुप्त माहितीच्या आधारे जीव धोक्यात टाकून अवैध गौण खनिजाचे ट्रॅक्टर पकडले .

परंतु वाहन चालक अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळाला .या बाबतीत महसूल पथकातील पटवारी विशाल कोसनकर यांनी रितसर कोरपना पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्याचे वृत्त आहे. उपरोक्त घटनेच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार असे कळते कि दि.११-०२-२०२३ ला कोरपना मंडळातील अंतरगाव बु .येथील तलाठी विशाल कोसनकर यांना वनोजा या नाल्यातून रेती चोरी वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली .

 

त्या नंतर कोरपना तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली महसूल पथकातील तलाठी प्रकाश कमलवार,वीरेंद्र मडावी,अमोल गोसाई, या शिवाय कोतवाल रुपेश पानपटे यांचेसह मध्य रात्री नारंडा येथील दिलीप मुदलवार, यांनी भाड्याने घेतलेले अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले.
सदरहु वाहन वनोजाचे योगेश नैताम याचे मालकीचे असल्याचे कळते. पथकांनी वरील वाहनांचा जप्तीनामा करून ते वाहन तहसील कार्यालयात जमा करण्याचे पथक प्रमुखाने सांगितले .असता वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहनासह तो फरार झाला .ह्याच रेती तस्कराचे यापूर्वी सुद्धा एक वाहन कोरपना तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते . दरम्यान या भागात अवैध रेती तस्करांची मूजोरी वाढली असून त्यांचे वाहनांवर दंडात्मक कारवाई व वाहन चालकांवर पोलिस कारवाई होणे गरजेचे झाले असल्याचे जनतेत बोलल्या जाते.

विशेष उल्लेखनीय बाब अशी की अवैध गौण खनिज प्रकरणात वापरणा-या या ट्रॅक्टरला कोणतीच नंबर प्लेट नव्हती. या पूर्वी सुद्धा अश्या ट्रॅक्टरला नंबरप्लेट नसल्याचे समजते.वेळ प्रसंगी तलाठी वर्ग अवैध रेती चोरीला आळा घालण्यासाठी स्वताच जीव धोक्यात टाकत असतात.
याच रेती तस्कराचे रेतीचे (अवैध ट्रॅक्टर) वाहन कोरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे व महसूल पथकांनी दिवसा ढवळ्या पकडले असताना त्याने अरेरावी व मारण्याची धमकी देत त्यांचे कडील ,मोबाईल हिसकावून फोटो व टेपिंग डिलीट केले, होते .असे ऐकिवात आहे.यांनी जर विरोध केला असता तर या वेळी एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता होती .शेवटी पोलीस स्टेशनला या बाबतीत रिपोर्ट झाली .
असेच एक प्रकरण कोडशी बू .येथील प्रदीप कुरसंगे यांचे ट्रॅक्टर (विना नंबरचे) रेती चोरी करताना गावकरी , पोलीस पाटील पांडुरंग जरीले व मंडळ अधिकारी पचारे यांनी पकडले होते.त्या बाबत पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता .

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा द्यावी व रेतीतस्करांवर कडक कारवाई करावी या शिवाय आरटीओ व पोलीस विभागास विना नंबरच्या वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावे .असे महसूल कर्मचारी वर्गात बोलल्या जाते.