Home Breaking News काव्यकुंज! कातडं ! : कवयित्री प्रा.डॉ.वैशाली भांडारकर, उमरेड

काव्यकुंज! कातडं ! : कवयित्री प्रा.डॉ.वैशाली भांडारकर, उमरेड

249

काव्यकुंज !कातडं ! : कवयित्री प्रा.डॉ.वैशाली भांडारकर, उमरेड

दिले अंगण
सावकाश पाय पसरायला
खेळ मांडला मी आता
माझ्याच संसाराचा
एका खांद्यावरून सहज
पाणी निथळत जावे समुद्रकिनाऱ्याचे

वर पाहताच अंबर
शुभ्र पांढरे मऊसुताचे
झुलतो पाळणा निळ्या तपकिरी छटांचा

कुणी सावरेल म्हणुनी
लाख दिल्या हाका
सारेच रस्ते निर्जन एकाकी
मला समजल्या रस्ता चुकीचा

पाय घातला नदीच्या पाण्यात
स्वतःला सावरले मेलेल्या मासोळीच्या
शांतचित्त देहाच्या कठड्यात

मग थोडयाशा प्रेमाने
मी सोलले माझे पांढरे शुभ्र कातडे
अंगा खांद्यावर दाटले
लाल रक्ताचे चांदणे

तसे रान आता हळूच जागे झाले
नाचू लागले एवढ्यासाठीच
पुन्हा एकदा ती हसली हम
मंद मंद वाऱ्याच्या सोबतीने

प्रा. डॉ. वैशाली भांडारकर, सहजं सुचलं सदस्य
महिला महाविद्यालय, उमरेड