Home Breaking News chandrapur city@ news १४ मार्च पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर !...

chandrapur city@ news १४ मार्च पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ! चंद्रपूर जिल्ह्यातील ८हजार कर्मचारी उतरणार संपात !

198

Chandrapur city@ news

■ १४ मार्च पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर !

■ चंद्रपूर जिल्ह्यातील ८हजार कर्मचारी उतरणार संपात !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर : NPS योजना रद्द करुन जुनी परिभाषित पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करा या प्रमुख मागणीसाठी दि. 14 मार्च 2023 पासून राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायती कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर यांनी आज बुधवारी या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान दिली.

याबाबत संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची नोटीस चंद्रपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. संपाची नोटीस देते वेळी चंद्रपूर जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर, सिंगलदीप कुमरे, नंदकिशोर गोल्लर, अजय चहारे, प्रशांत कोशटवार, अविनाश बोरगमवार, प्रविण अदेंकीवार, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, जितेंद्र टोंगे, गणेश पाल, राकेश जांभुळकर व विविध कार्यालयाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांच्या सेवा नियमित करा या प्रलंबित मागण्यांसाठी दि. 14 मार्च पासून राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपात उतरणार आहे
या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील आठ हजार कर्मचारी सहभागी होत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी या संपात उत्स्फुर्तंपणे सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे,कोषाध्यक्ष संतोष अतकरे उपाध्यक्ष अविनाश नंबोरगमवार तसेच अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.