Home Breaking News Varora taluka@ news ■ जो पर्यंत शासन जुनी पेन्शन देत नाही...

Varora taluka@ news ■ जो पर्यंत शासन जुनी पेन्शन देत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही:सुनिल दुधे ■ एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणाबाजीने वरोरा नगरी अक्षरशः दुमदुमली! ■राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा निघालेल्या रॅलीने सर्वांचेंच लक्ष वेधले ! ■ बाल कलाकार कु.अधिश्री व अधिरा ठरले हे भव्य रॅलीचे खास आकर्षण !

163

Varora taluka@ news

■ जो पर्यंत शासन जुनी पेन्शन देत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही:सुनिल दुधे

■ एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणाबाजीने वरोरा नगरी अक्षरशः दुमदुमली!

■राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा निघालेल्या रॅलीने सर्वांचेंच लक्ष वेधले !

■ बाल कलाकार कु.अधिश्री व अधिरा ठरले हे भव्य रॅलीचे खास आकर्षण !

सुवर्ण भारत:किरण घाटे (सह संपादक)

वरोरा:जो पर्यंत महाराष्ट्र शासन जुनी पेन्शन देत नाही तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही असे स्पष्ट मत जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य सल्लागार सुनिल दुधे यांनी आज गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना वरोरा मुक्कामी व्यक्त केले . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जूनी निवृत्ती वेतन लागू करा या प्रमुख मागणीसह शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि.१४मार्चपासून बेमुदत संप सुरू केलेला आहे .आज या संपाचा तिसरा दिवस आहे . दरम्यान आज जिल्ह्यातील वरोरा येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी शहरातील मुख्य मार्गाने भव्य रॅली काढून आपला आक्रोश व्यक्त केला .

या बेमुदत संपाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाभर दिसून येत आहे. गुरुवारी दुपारी सुनिल दुधे यांनी वरोरा उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या संप मंडपात संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. जो पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आपण मागे हटायचे नाही असे देखील ते आज आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हणाले.

याच संप मंडपात महिला शिक्षकांनी पेंशनवर आधारित उत्तमरित्या एक पथनाट्य सादर केले .तर काही महिलां कर्मचाऱ्यांनी पेंशनवरच आधारित गिते गाऊन संपकर्त्यांची मने जिंकली.

ख-या अर्थाने आज लक्ष वेधले ते रॅलीत सहभागी झालेल्या कु. अधिश्री आखाडे व अधिरा आखाडे या दोन बाल कलाकारांनी !त्यांच्या हातातील (पेंशन मागणीचे )फलक व त्यांचे मुखातून “एकच मिशन जूनी पेन्शन “मागणीचे घोषणा वाक्य! हाच एक वरोराकरांसाठी आज चर्चेचा विषय ठरला होता.
बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम झाला हे मात्र तेवढेच खरे आहे.सुरु असलेल्या या बेमुदत संपाला वरोरा तालुक्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे एका पदाधिका-याने या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.दरम्यान संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज संप मंडपी स्थळी एका शासन परिपत्रकाची होळी देखिल केली.