Home Breaking News Ballarpur city@ news बल्हारपूर नगरीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची भव्य बाॅईक रॅली...

Ballarpur city@ news बल्हारपूर नगरीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची भव्य बाॅईक रॅली ! आक्रोश रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चवथा दिवस !!

200

Ballarpur city@ news

• बल्हारपूर नगरीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची भव्य बाॅईक रॅली !

• आक्रोश रॅलीने अनेकांचे लक्ष वेधले !

• राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा आज चवथा दिवस !

सुवर्ण भारत: किरण घाटे (सहसंपादक)

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जूनी निवृत्ती वेतन लागू करा या प्रमुख मागणीसह शासन स्तरावर गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि.१४मार्चपासून बेमुदत संप सुरू केलेला आहे . आज या संपाचा चवथा दिवस आहे. दरम्यान आज शुक्रवार दि.
१७ मार्चला सकाळी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्हारपूर शहरात घोषणा देत भव्य बाईक रॅली काढून आपला आक्रोश व्यक्त केला . दुपारी ही बाॅईक रॅली स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभारलेल्या संपा मंडपात पोहचली. या नंतर संप मंडपात संघटनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.सुरु असलेल्या या बेमुदत संपाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाभर दिसून येत आहे. आज उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेरील प्रवेश व्दराजवळ संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या एका परिपत्रकाची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मागे हटायचे नाही असा निर्धार संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे एकंदरीत दिसून येते. या बेमुदत संपामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम झालेला आहे.
दरम्यान राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिपक जेऊरकर व राजू धांडे यांनी हा बेमुदत संप चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.