Home Breaking News ghadchiroli@ dist news • युवकांसोबत युतींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे:भाग्यश्रीताई आत्राम. ...

ghadchiroli@ dist news • युवकांसोबत युतींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे:भाग्यश्रीताई आत्राम. •आरेंदा येथे पहिल्यांदाच मुलींची कबड्डी सामने. •एकाच वेळी दोन सामान्यांचा उदघाटन सोहळा.

92

ghadchiroli@ dist news
• युवकांसोबत युतींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे:भाग्यश्रीताई आत्राम.

•आरेंदा येथे पहिल्यांदाच मुलींची कबड्डी सामने.

•एकाच वेळी दोन सामान्यांचा उदघाटन सोहळा.

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (मुख्य संपादक)

अहेरी:- आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी मुलींमध्ये विविध कला गुण दडलेले आहे. विशेष म्हणजे या भागातील मुलींनी क्रीडा क्षेत्रात लक्ष दिल्यास नक्कीच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारण्याची संधी प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे युवकांसोबत युतींनीही क्रीडा क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले. ते आरेंदा येथे मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून आरेंदाचे सरपंच व्यंकटेश तलांडी,प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवर, येरमनार चे माजी सरपंच बालाजी गावडे,आरेंदाचे उपसरपंच बुज्जी आत्राम,भांगाराम पेठाचे सामाजिक कार्यकर्ता बाबुराव तोरेम,तिरुपती मडावी,आरेंदा ग्रा पं. सदस्य मुरा आत्राम,पेंटा आत्राम,वारलु तलांडी, अनिल दुर्गे,देवाजी सडमेक,लक्ष्मण मडावी,लालचंद तलांडी,बंडु आत्राम, राकेश महा,साधू आत्राम, प्रकाश दुर्गे, महारू आत्राम,दस्सा आत्राम,मंगेश आत्राम,तुळशीराम आत्राम,संजय आत्राम,राजु आत्राम,कोरके तलांडी, चैतू आत्राम,मादी आत्राम,पोच्यु दुर्गे, रामजी आत्राम,वंजे तलांडी,देव आत्राम,काजल आत्राम,रजनी तलांडी,कमली आत्राम,सुमन तलांडी, मासे आत्राम,इरपे तलांडी,प्रेमिला दुर्गे,सपना आत्राम तसेच मौजा आरेंदा गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत महिला खांद्याला खांदा लावून पुढे जाताना दिसून येत आहेत. क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांनी भारताचे नावलौकिक केलेले आहेत. मात्र त्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ग्रामीण भागात दाखविलेल्या क्रीडा कौशल्यामुळेच त्यांना ती पातळी गाठता आली. त्यामुळे विविध क्रीडा स्पर्धामध्ये नेहमीच सहभाग होऊन आपल्या मधील क्रीडा कौशल्य दाखविन्याचे आवाहनही त्यांनी केले.

आरेंदा येथे पहिल्यांदाच मुलींची कबड्डी सामने आयोजीत करण्यात आले. त्यासोबतच मुलांसाठी सुद्धा क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दोन्ही सामन्याचे उद्घाटन माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागात नेहमीच मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात. मात्र, पहिल्यांदाच मुलींची कबड्डी सामने आयोजन केल्याने आरेंदा परिसरातील मुली आणि महिला मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले हे विशेष.