Home Breaking News chandrapur@ dist news • मुंबईचे पोलिस महानिरीक्षक दीपक पांडेंनी दिली भद्रावती...

chandrapur@ dist news • मुंबईचे पोलिस महानिरीक्षक दीपक पांडेंनी दिली भद्रावती समुपदेशन केंद्राला भेट.. ! •जाणून घेतले सुनंदा खंडारकर,अनिता शहा , किर्ती पांडे ,किरण साळवींसह अनेकांची मते.. ! •दिपकांता लभानेंच्या कामाची केली उपस्थित महिलांनी स्तुती.. !

80

chandrapur@ dist news

• मुंबईचे पोलिस महानिरीक्षक दीपक पांडेंनी दिली भद्रावती समुपदेशन केंद्राला भेट.. !

•जाणून घेतले सुनंदा खंडारकर,अनिता शहा , किर्ती पांडे ,किरण साळवींसह अनेकांची मते.. !

•दिपकांता लभानेंच्या कामाची केली उपस्थित महिलांनी स्तुती.. !

सुवर्ण भारत:किरण घाटे (सहसंपादक)

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पोलिस स्टेशनमधील महिला समुपदेशन केंद्राला दि.२३ मार्चला महिला व बाल अपराध विभाग मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे यांनी भेट दिली.या वेळी त्यांनी या ठिकाणी उपस्थित पिडीत महिलां व व्यक्तींशी संवाद साधला . तदवतचं समुपदेशन केंद्राचा सविस्तर आढावा जाणून घेतला . भेटी दरम्यान भद्रावती लोकमत सखी मंचच्या सुनंदा खंडारकर ,न.प.बचत गटाच्या अध्यक्ष अनिता शहा , सामाजिक महिला कार्यकर्त्या किर्ती पांडे , व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापक व अध्यक्ष कु.किरण साळवीं यांचे सह अनेकांची मते पोलिस महानिरीक्षकांनी जाणून घेतली .

या वेळी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी , अप्पर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू , उप पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी , पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे ,टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईच्या विभागीय समन्वयक प्रतिभा गजभिये ,संरक्षण अधिकारी कविता राठोड , संरक्षण अधिकारी मोदीलवार या शिवाय भद्रावती पोलिस स्टेशनचे अधिकारी , कर्मचारी , गावातील महिला व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.उपस्थित महिलांनी महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका दिपकांता लभाने यांचे कामांची या वेळी पोलिस महानिरीक्षकांसमक्ष स्तुती केली.भेटीच्या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.सदरहु कार्यक्रमाचे संचालन दिपकांता लभाने यांनी केले.