Home Breaking News chandrapur@ city news • चंद्रपूर शहराच्या विकासासाठी प्रादेशिक विकास योजने अतर्गंत...

chandrapur@ city news • चंद्रपूर शहराच्या विकासासाठी प्रादेशिक विकास योजने अतर्गंत निधी मंजूर.. ! • आ. किशोर जोरगेवारांचे प्रयत्न..!!

363

chandrapur@ city news

•चंद्रपूर शहराच्या विकासासाठी प्रादेशिक विकास योजने अतर्गंत निधी मंजूर.. !
•आ. किशोर जोरगेवारांचे प्रयत्न..!

चंद्रपूर:किरण घाटे(सह सहसंपादक)

चंद्रपूर:चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरातील महत्वाच्या विकासकामांसाठी प्रादेशिक विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चंद्रपूर–नागपूर मार्गावर भव्य प्रवेशव्दार, प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरण आणि महाकाली पोलीस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौक येथे सौंदर्यीकरण आदीं कामे करण्यात येणार आहे.

चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी विविध विभागाच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मतदार संघातील अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. चंद्रपूर मतदार संघात ९ अभ्यासिकांचे कामे मंजुर झाली असून तीन अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले आहे. तर ६ समाज भवनांची कामे मंजूर करण्यात आली आहे.

नुकतेच विशेष रस्ते निधी अंतर्गत दुर्लक्षित असलेल्या शहरातील हिंग्लाज भवानी वार्डाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तर आता प्रादेशिक विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २ कोटी रुपये खर्च करून चंद्रपूर–नागपूर मार्गावर भव्य प्रवेशव्दार उभारण्यात येणार असून चंद्रपूरमध्ये दाखल होताच सुंदर असे भव्य प्रवेशव्दार नजरेस पडणार आहे. तर प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरणासाठी २ कोटी रुपयांचा निधी खर्च केल्या जाणार आहे. या निधीतून येथे आकर्षक रोषणाईसह इतर सौंदर्यीकरणाची कामे केल्या जाणार आहे. महाकाली पोलिस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौकातील सौंदर्यीकरणासाठी सदरहु निधीतील १ कोटी रुपये खर्च केल्या जाणार आहे. होणार असलेल्या या कामांमुळे चंद्रपुरातील सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.