Home Breaking News Gughus @city news • दहावीच्या परीक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती निशुल्क टॅब...

Gughus @city news • दहावीच्या परीक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती निशुल्क टॅब योजनेचा लाभ घ्यावा:जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

67

Gughus @city news

• दहावीच्या परीक्षेला देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाज्योती निशुल्क टॅब योजनेचा लाभ घ्यावा:जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे..

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

घुग्घुस : महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मोफत टॅबलेट योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना महाज्योती निशुल्क टॅब योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.

ओबीसी, एसबीसी आणि एनटी जातींमधील जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यास तयार आहेत त्यांना निशुल्क टॅब आणि ६ जीबी दैनिक इंटरनेट डेटा दिला जाईल. जे विद्यार्थी सन २०२३ मध्ये १०व्या वर्गाची परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांना अर्ज करण्याची शेवटची अंतीम तारीख ऑनलाइन अर्जासाठी १० एप्रिल आहे.

मोफत अर्जासाठी घुग्घुस येथील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.