Home Breaking News chandrapur @city news • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी राज्य शासन सकारात्मक:आ. किशोर...

chandrapur @city news • चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी राज्य शासन सकारात्मक:आ. किशोर जोरगेवार. • विकासकामांचे आ. जोरगेवारांच्या हस्ते भूमिपूजन.

68

chandrapur @city news
• चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी राज्य शासन सकारात्मक:आ. किशोर जोरगेवार.
• विकासकामांचे आ. जोरगेवारांच्या हस्ते भूमिपूजन.

सुवर्ण भारत :किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर:चंद्रपूरकरांनी अपक्ष आमदार म्हणून ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिले .या मतदार संघाच्या विकासासाठी सत्ते सोबत राहणे गरजेचे व तेवढेच आवश्यक होते. विकासकामांच्या रूपाने आता मोठा फायदा होत आहे. मागील आठ दिवसांत विविध विभागाच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा निधी चंद्रपूर मतदार संघाच्या विकासाठी उपलब्ध केला असून राज्य सरकार विकासासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

रयतवारी कॉलनी आणि घुटकाळा वार्ड येथे ९० लक्ष रुपयांच्या विकासकामाचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, सामजिक कार्यकर्ता इंदुलता गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, दीपक वर्मा, अजय मिस्त्री, नवशाद सीध्दिकी, विनोद गुप्ता, सुरेंद्र सोनकर, गोरेलाल केवट, सुलतान अली, चंद्रराज बातव, भोलाप्रसाद प्रजापती, रणजीत राजभर, रितेश सोनकर, अमोल वर्मा, जितेंद्र जयस्वाल, मायादिन रविदास आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

चंद्रपूर मतदारसंघातील विकासकामांना आता गती मिळाली आहे. शिंदे व फडणविस सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. बाबूपेठ येथील हिंग्लाज भवानी वार्डातील विकासासाठी आपण विशेष रस्ता निधी अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून येथे सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तर शहरातील महत्वाच्या विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चंद्रपूर – नागपूर मार्गावर भव्य प्रवेशव्दार, प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरण आणि महाकाली पोलिस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौक येथे सौंदर्यीकरण आदीं कामे करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दलित वस्ती सुधार निधी अंतर्गतही ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील अनेक विकास कामे केल्या जाणार असल्याचे आ.जोरगेवार यावेळी म्हणाले.

रयतवारी कॉलनी येथील सिमेंट कॉंक्रीट रोडचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. या कामासाठी नगर विकास विभागाच्या मुलभूत सोई सुविधा निधी अंतर्गत ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देता आला याचा आनंद होत आहे. घुटकाळा येथे ही आपण ४० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून तेथील विकासकामाचे ही भूमिपूजन करण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले सदरहु भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.