Home क्राईम chandrapur@ dist news • एक दिवसीय महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन!

chandrapur@ dist news • एक दिवसीय महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन!

164

chandrapur@ dist news
• एक दिवसीय महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन!

सुवर्ण भारत: किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे दि.४ एफ्रिलला एक दिवसीय भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या अधिसेविका वंदना बरडे यांचे हस्ते झाले. आरोग्य योजनेची सविस्तर माहिती त्यांनी या वेळी दिली. तद्वतच आरोग्याची काळजी घेण्या बाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .आरोग्यदायी जिवन शैलीही बरडे यांनी आपल्या बोलण्यातून समजावून दिली.आहार योगा प्राणायाम मेडिटेशन, अवयव दान देहदान ,नेत्रदान ,रक्तदान, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, शिशू सुरक्षा माता सुरक्षा,जाग्रुत पालक सुदृढ बालकाचे महत्व समजावून सांगितले .आहारा विषयी समज व गैरसमज या बाबतीत त्यांनी उपस्थितीतांना माहिती दिली.कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली होती.