Home Breaking News chandrapur dist@ news • पत्रकारांना मारहाण करणाऱ्या “त्या “सहाय्यक पोलिस निरीक्षकास निलंबित...

chandrapur dist@ news • पत्रकारांना मारहाण करणाऱ्या “त्या “सहाय्यक पोलिस निरीक्षकास निलंबित करण्याची मागणी ! • डिजीटल मिडीया असोसिएशनचे चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर !

249

chandrapur dist@ news
• पत्रकारांना मारहाण करणाऱ्या “त्या “सहाय्यक पोलिस निरीक्षकास निलंबित करण्याची मागणी !

• डिजीटल मिडीया असोसिएशनचे चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर !

सुवर्ण भारत :किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर :पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीच्या पत्रकारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलींद गेडाम यांनी कुठलेही कारण नसताना मारहाण केली.त्या सहाय्यक पोलिस निरीक्षकास तातडीने निलंबित करण्याची मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने चंद्रपूर पोलिस अधिक्षकांना एका लेखी निवेदनातून करण्यात आली. यावेळी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघचे अध्यक्ष मझहर अली, डिजिटल मीडिया एसोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, आशिष अंबाड़े, सारंग पांडे, राजेश सोलापन, सुनील तायड़े, विजय सिद्धावार, जितेंद्र जोगड, राजू बित्तुरवार, दिनेश एकवोंकर, राजेश नायडू, हिमायु अली, होमदेव तुम्मेवार, मोरेश्वर उदोजवार, मनोहर दोतपल्ली, तुलशीराम जांबुळकर, गणेश अडूर, करण कंदूरी, प्रशांत रामटेके, शंकर महाकाली, धम्मशील शेंडे, गौरव पराते, सुनील गेडाम आदीं पत्रकार उपस्थित होते.

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पार्थशर समाचार या वृत्त वाहिणीचे प्रशिणार्थी पत्रकार नेमन धनकर आणि सुनिल देवांगण हे चंद्रपूरात सुरु असलेल्या माता महाकाली यात्रेमध्ये आलेल्या भाविकांना स्नानाची पुरेसी व्यवस्था प्रशासनाकडून केली गेली नव्हती.दरम्यान उघड्यावर व अस्वच्छ पाण्यात स्नान करीत असतांना व्हिडीओ शुटींग करत असतांना सब इन्स्पेक्टर मिलिंद गेडाम यांनी त्यांची कोणतीही विचारणा न करता त्यांना मारहाण केली व महाकाली मंदिर परिसरात पोलिस विभागाने स्थापित केलेल्या चौकीमध्ये या दोन ही पत्रकारांना घेऊन जाऊन त्याठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली,विशेष म्हणजे या प्रतिनिधी जवळ ओळख पत्र होते. नंतर या घटनेची माहिती पार्थशर समाचारचे मुख्य संपादक राजेश नायडु यांना मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पोलिस चौकीला भेट देवून सदरहु पत्रकार हे पार्थशर समाचार साठी वृत्त संकलन करीत होते . त्यामुळे त्यांनी व्हिडीओ शुट करणे भाग असल्यामुळे ते व्हिडीओ शुट करीत असल्याचे प्रत्यक्ष सांगितल्यानंतर सुद्धा गेडाम यांनी पत्रकाराजवळील मोबाईल हिसकावून घेऊन व्हिडीओ डिलीट केले. पोलिसांची पत्रकारांशी केलेली वागणुक ही अत्यंत निंदनीय आहे. पत्रकारांना अपमानास्पद वागणुक देणा-या पोलिस अधिकारी मिलिंद गेडामवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी पत्रकार संघातर्फे आज गुरुवार दि. ६ एप्रिलला चंद्रपूरच्या पोलिस अधिक्षकांना एक लेखी निवेदन देण्यात आले.