Home Breaking News chandrapur @city news • वणी बुजरुककरांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.!

chandrapur @city news • वणी बुजरुककरांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.!

177

chandrapur @city news
• वणी बुजरुककरांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.!

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्यातील वणी बुजरुक येथील जल जीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या नळ योजनेचे (टाकी व गावातील नळाचे) भूमिपूजन नुकतेच भाजपाचे युवा नेता महेश देवकते यांचे हस्ते झाले.याच छोट्या गावातील गावकरी मंडळीनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली योजना या गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या शिवाय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, तदवतचं माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे व माजी आमदार संजय धोटे यांचे देखिल गावकऱ्यांनी आभार मानले आहे.