Home Breaking News chandrapur@ dist news • व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र...

chandrapur@ dist news • व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र जोगड यांची नियुक्ती

282

chandrapur@ dist news
• व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र जोगड यांची नियुक्ती

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर : राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या साप्ताहिक विभागाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र जोगड यांची नियुक्ती करण्यात आली.
व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी या नियुक्तीचे पत्र पाठ,

 

जितेंद्र जोगड, हे चंद्रपुर जिल्ह्यातील ज्येष्ठ संपादक असून, मागील २३ वर्षापासून पत्रकारीतेत व १४ वर्षापासून वृतपत्रचे संपादक आहेत. विदर्भ की बात या वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधि म्हणून काम केले असून, त्यांचे रजिस्ट्रेशन ऑफ न्यूज़पेपर (आर.एन.आई) यांच्या विविध विषयावर त्यांचे चांगले अभ्यास आहे ते राज्यातील व राज्या बाहेरिल वर्तमानपत्रंना सहकार्य व मार्गदर्शन करतात. जितेंद्र जोगड हे साप्ताहिक लोकतंत्र की आवाज़ आणि लोकतंत्र की आवाज़ या डिजिटल मीडिया पोर्टलचे संपादक आहेत. या क्षेत्रातील विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले आहेत. विविध सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, व्यापारी संघटनांशी ते जुडले असून, व्हाईस ऑफ मीडियाच्या या माध्यमातून वृतपत्रा चे आर.एन.आई एनुअल रिपोर्ट सबमिट शिबिर आणि (आर.एन.आई) चे नवीन नियम यावर प्रशिक्षण मेळावे आयोजित करून चंद्रपुर जिल्ह्यातील साप्ताहिक संपादकांना पत्रकारांना प्रशिक्षित करू, असा विश्वास त्यांनी नियुक्तीप्रसंगी व्यक्त केला आहे.

जितेंद्र जोगड यांची निवड झाल्याबद्दल, व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपुर महानगर अध्यक्ष सारंग पांडे, चंद्रपुर महानगर कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांचे त्यांनी आभार मानले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील साप्ताहिक विभाग ची कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार असून या संघटनेची जुळून कार्य करण्याकरिता ९८२२२२०२७३ वर संपर्क साधण्याचे आवाहन जितेंद्र जोगड यांच्या कडून करण्यात आले आहे.