Home Breaking News chandrapur @dist news • चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणावर नियत्रंण करण्याची मनसेची मांगनी. ...

chandrapur @dist news • चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणावर नियत्रंण करण्याची मनसेची मांगनी. • प्रादेशिक अधिकारी प्रदुषण मंडळ यांना प्रतिभा ठाकुर व भरत गुप्ता निवेदन दिले कार्यवाही करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

355

chandrapur @dist news
• चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणावर नियत्रंण करण्याची मनसेची मांगनी.

• प्रादेशिक अधिकारी प्रदुषण मंडळ यांना प्रतिभा ठाकुर व भरत गुप्ता निवेदन दिले कार्यवाही करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

सुवर्ण भारत: ग्यानिवंत गेडाम
विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर:चंद्रपुर जिल्हा एक औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो,तसेच एशिया खंडात सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत ही चंद्रपुर जिल्ह्याचा नाव लौकिक होत चालला आहे.
जिल्ह्यात रोजगार नाममात्र उपलब्ध आहे पण उद्योगांच्या नावाखाली प्रदूषण भरमसाठ वाढत आहे,याला जवाबदार असलेल्या MIDC एम.आई.डी.सि मधील लोयड्समेटल,श्री. सिध्दबली इस्पात लिमिटेड, चमन मेंटलीक्स लिमिटेड,गोपानी आयर्न अँड पॉवर लिमिटेड,मल्टि ऑरगॅनिक्स,सनविजय आलाँय अँड पॉवर लिमिटेड,धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड तसेच जिल्हयातील विविध ठिकाणी सुरू असलेले कोळसा खाणी, आर्यन कोल वाशरीज,सिमेंट कंपनी- ए.सी.सी सिमेंट,माणिकगढ सिमेंट, अंबुजा सिमेंट,दालमिया व अल्ट्राटेकसिमेंट व तसेच एशिया खंडात प्रसिद्ध असलेला चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन अशे अनेक उद्योग या जिल्ह्यात आहे,उद्योग लावतांना नियम व अटी ची मान्यता स्वीकारून उद्योग सुरू करतात पण एकदा उद्योग सुरू झाला की नियम व अटी केराच्या टोपलीत टाकत हे लोक अधिकाऱ्याला आर्थिक देवाण घेवाण करत सर्रास नियमाची पायमल्ली करत असतात,त्याचाच उदाहरण म्हणजे आज जिल्हा प्रदूषणात अव्वल आहे.
या विषयवार माहिती दिली व प्रादेशिक अधिकारी मंडळ यांना निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण मुक्त करा नाही तर मनसे तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा प्रतिभा ठाकुर, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता व कार्यकर्ते उपस्थित होते आले.