Home Breaking News Chandrapur @city news • सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप सदैव नवोदित साहित्यिकांना...

Chandrapur @city news • सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप सदैव नवोदित साहित्यिकांना व कलावंतांना प्रोत्साहन देणारा गृप-मुग्धा खांडे

394

Chandrapur @city news

• सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप सदैव नवोदित साहित्यिकांना व कलावंतांना प्रोत्साहन देणारा गृप-मुग्धा खांडे

सुवर्ण महाराष्ट्र:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर:चंद्रपूर गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक नवोदित साहित्यिकांना, कलावंतांना व शैक्षणिक क्षेत्रात स्वता सोबतच आपल्या गावाचे नांव रोशन करणा-या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित व प्रेरणा देण्याचे उल्लेखनीय कार्य महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप (महिला)गृपने केले आहे.आज या गृपचे नांव अनेकांना मुखपाठ झाले आहे.एव्हढेच नाही तर हा गृप तेव्हढाच लोकप्रिय झाला आहे.अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या व अनेक सामाजिक धार्मिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राशी जुळलेल्या मुग्धा खांडे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधी जवळ बोलताना दिली आहे.गेल्या नव वर्षांपासून उपराजधानी नागपूरच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या गृप बाबत कणकवली तालुक्यातील असलदे येथील उमेद अभियान अंतर्गत सीआरपी म्हणून कार्यरत असणाऱ्या व दिव्यांग बांधवांसाठी सतत झटणाऱ्या सानिका सुनिल तांबे , सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा दिनेश तेली, नागपूर येथील सुपरिचित कवयित्री प्रा .वैशाली राऊत ,कोरपना तालुक्यातील महिला कार्यकर्त्या वंदना निरांजने,चंद्रपूर शहरातील महिला कार्यकर्त्या प्रविणा प्रविण वाघाडे, स्थानिक महिला कार्यकर्त्या व शहरातील सामाजिक संघटनेशी निकटचे संबंध ठेवणाऱ्या व अनेक आंदोलनात स्वयंस्फूर्तिनें सहभागी होणा-या सुरेखा चिडे , भद्रावती नगरीतील व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीत कार्यरत असणाऱ्या कला कोडापे , नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरच्या प्रख्यात मेकअप आर्टिस्ट सोनाली गोडाने या शिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील मूळ रहिवाशी असलेल्या गायत्री रणदिवे यांनी सहज सुचलं गृपला प्रथम क्रमांकाची पावती देत नवोदितांसाठी हा गृप खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सहज सुचलं गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूरच्या रंज्जू दिलीप मोडक तर याच गृपच्या सहसंयोजिका कोठारीच्या वर्षा कोंगरे आहे.