Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर शहरात नगरपरिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची व्यवस्था...

Ballarpur city@ news • बल्लारपूर शहरात नगरपरिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची व्यवस्था करा:आम आदमी पार्टी

473

Ballarpur city@ news

• बल्लारपूर शहरात नगरपरिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाची व्यवस्था करा:आम आदमी पार्टी

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर: बल्लारपूर शहरात नगरपरिषद नवीन इमारत बांधली जाणार ही चर्चा सुरू होताच आम आदमी पार्टीने त्याविरोधात आक्रमक भुमिका घेतली होती. जोपर्यंत नगरपरिषदेच्या शाळांमध्ये सुधार होत नाही तोपर्यंत नगरपरिषदेला विरोध राहिल हि पक्षाची भुमिका होती.

या भुमिकेनंतर उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी ,तहसिलदार, शिक्षणाधिकारी अश्या अनेक अधिकाऱ्यांसोबत पक्षाच्या बैठका झाल्या. प्रशासनाने वेळोवेळी शाळांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन देखील दिले व त्यानंतर अनेक सुधारणाही झाल्या. नवीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली.

आता नवीन सत्रापूर्वी आवश्यक नियोजना संदर्भात माहितीची मागणी करण्यात आली. तसेच बल्लारपूर शहरातील तीन विभागामध्ये इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येकी एक अश्याप्रकारे तीन प्राथमिक शाळां तसेच संपूर्ण शहरात एक इंग्रजी माध्यमिक शाळेची मागणी पक्षातर्फे करण्यात आली. यावेळेस मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देतांना शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, जिल्हा संघठण मंत्री प्रा.नागेश्वर गंडलेवार, गणेश सिलगमवार, ज्योतिताई बाबरे, सागर कांमळे, रोहित जंगमवार, सलमा सिद्दिकी, सह प्रमुख आशिष गेडाम, अफझल अली, महेंद्र चुनारकर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.