Home Breaking News Bhandara dist@ news •पवनी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाला झाली सुरुवात ! •...

Bhandara dist@ news •पवनी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाला झाली सुरुवात ! • वाघाच्या दहशतीतही “ते” जीव मुठीत घेऊन करतात तेंदूपत्ता संकलन !

60

Bhandara dist@ news
•पवनी तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाला झाली सुरुवात !

• वाघाच्या दहशतीतही “ते” जीव मुठीत घेऊन करतात तेंदूपत्ता संकलन !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

भंडारा: विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील गरीब, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे आर्थिक स्रोत म्हणून तेंदू हंगाम असतो. कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारा हा रोजगार आहे भुयार,निष्ठी,वायगाव, शिरसाळा.वाही, शिगोरी, वेळवा, आदीं परिसरातील गावांत तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला मोठ्या जोमाने सुरुवात झाली आहे. राज्यात संचारबंदीचा काळात सर्व सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला होता. परंतु तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू झाल्यामुळे या भागातील काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्न दूर झाल्याने मजुरांमध्ये आनंद व उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

तेंदू हंगामाच्या रक्कमेतून पावसाळ्यात उदरनिर्वाह करिता लागणारा खर्च व शेती अवजारे, खत पाणी याच रक्कमेतून केल्या जाते.या शिवाय घर कामाला देखील आर्थिक मदत मिळते.

या वर्षी तेंदू हंगाम होणार की नाही अशी जनतेत विशेषतः महिला वर्गात चर्चा सुरू होती.परंतु पेसा अंतर्गत तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने मजुंरामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण झाल्याचे या परिसरात एकंदरीत दिसून येते.
या वर्षी तेंदू हंगाम होणार की नाही असे वाटत होते. सामाजिक कार्यकर्ते मेघराज जोगवे व माजी सरपंच अशोक बाळबूधे यांच्या प्रयत्नातून तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू झाल्याने गरीब व सर्व सामान्य जनतेला आर्थिक पाठबळ मिळाल्याचं समाधान अनेकांच्या चेह-यावर दिसत आहे .याच रोजगाराच्या माध्यमातून मिळालेल्या रक्कमेतून शेतीचे अन्य कामे होऊ शकतात.असे तेथील जनतेचे म्हणणे आहे.