Home Breaking News Chandrapur city@ news • मुग्धा खांडे ,रंज्जू मोडक, व वर्षा...

Chandrapur city@ news • मुग्धा खांडे ,रंज्जू मोडक, व वर्षा कोंगरेंने केले अपूर्वा बन्सोडचे अभिनंदन..! •अपूर्वाने प्राप्त केले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश..! • चंद्रपूर जिल्ह्यातही “ती “ठरली अव्वल.. !

143

Chandrapur city@ news

• मुग्धा खांडे ,रंज्जू मोडक, व वर्षा कोंगरेंने केले अपूर्वा बन्सोडचे अभिनंदन..!

•अपूर्वाने प्राप्त केले दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश..!

•चंद्रपूर जिल्ह्यातही “ती “ठरली अव्वल.. !

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर:केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून जिल्ह्यातील तळोधी बाळापूरच्या जवाहर नवोदय विद्यालयाची (दहावीत शिकणारी )अपूर्वा माधव बन्सोडने ९८.४ टक्के गुण घेत चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

नियमित अभ्यास, व कठोर पारिश्रमाच्या बळावर अपूर्वाने हे घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेतील प्राचार्य, शिक्षकवृंद व आई वडिलांचे मार्गदर्शन आपणांस वेळोवेळी मिळाले असल्याचे अपूर्वाने काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .

दरम्यान अपूर्वाने या परीक्षेत मिळविलेल्या यशाचे अनेकांनी तोंडभरून कौतुक केले असून चंद्रपूर शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या मुग्धा खांडे ,या शिवाय नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक व सहसंयोजिका वर्षा कोंगरे यांनी अपूर्वाचे अभिनंदन केले आहे. अपूर्वाचे वडील हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्यांनी नोकरी सांभाळून मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले आहे !

बारावीत चांगले गुण संपादन करुन उच्च अधिकारी होण्याचाअपूर्वाचा मानस आहे.