Home Breaking News आदिवासी विधवा महिलेला दिल्या भूलथापा दलालाची करामत! कोट्यवधींची जमीन हडप...

आदिवासी विधवा महिलेला दिल्या भूलथापा दलालाची करामत! कोट्यवधींची जमीन हडप करण्याचा केला प्रयत्न! दलालासह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुनिल मुसळे व पुंडलिकराव गोठेंची वरिष्ठांकडे मागणी

69

•आदिवासी विधवा महिलेला दिल्या भूलथापा दलालाची करामत!

• कोट्यवधींची जमीन हडप करण्याचा केला प्रयत्न!

• दलालासह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सुनिल मुसळे व पुंडलिकराव गोठेंची वरिष्ठांकडे मागणी

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

चंद्रपूर: जिल्ह्याच्या चंद्रपूर तहसिल अंतर्गत येणाऱ्या पदमापूर तलाठी साज्यातील चिंचोली येथील बनावट विक्री प्रकरणात सखोल चौकशी करून यातील दोषी असलेला दलाल , अधिकारी व कर्मचारी यांचेवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(रिपाई खोब्रागडे गट) लोकसभा अध्यक्ष पुंडलिकराव गोठे यांनी नुकतीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे एका लेखी निवेदनातून केली आहे.चिंचोली या गावात जैनाबाई दामोधर पेंदाम या आदिवासी विधवा महिलेची १हेक्टर ७६आर शेतजमीन आहे.दलाल दिलीप राजगूरे यांनी या संपूर्ण विक्री प्रकरणात सर्व कागदपत्रे बनावट करून त्या महिलेला भूलथापा देत त्या शेत जमीनीची दुय्यम निबंधक कार्यालयात मुखत्यारपत्राच्या आधारे विक्री करून घेतली .काही दिवसांनी ही बाब माहिती होताच त्या महिलेने थेट तलाठी कार्यालय गाठून आपला सातबारा उचलला .तेव्हा सातबारा वरील नांव बदलल्याचे लक्षात आले.लगेच तिने रामनगर पोलिस स्टेशनला जावून तक्रार नोंदविली असल्याचे आपच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.पण संबंधित अधिकाऱ्यांकडून तिला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.शेवटी हतबल झालेल्या जैनाबाईने चंद्रपूर जिल्हा आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांना आपली आपबिती सांगितली.मुसळे यांनी या प्रकरणात कुठलाही विलंब न लावता हे बनावट विक्री प्रकरण उघडकीस आणले . सध्या या प्रकरणा बाबत चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.आपच्या पदाधिकाऱ्यांनी देखिल या प्रकरणात दोषी असलेले दलाल अधिकारी व कर्मचारी यांचेवर तातडीने कारवाई करुन त्या विधवा आदिवासी महिलेला न्याय देण्याची मागणी केली आहे.दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित तलाठ्याचे जिल्हास्तरीय पथकाकडून सखोल तलाठी दप्तर तपासणी करण्याची मागणी पुंडलिकराव गोठे यांनी केली आहे.