Home Breaking News Ballarpur city @news •बाल कामगार विरोधात अभियान विविध उपक्रमाचे आयोजन

Ballarpur city @news •बाल कामगार विरोधात अभियान विविध उपक्रमाचे आयोजन

49

Ballarpur city @news
•बाल कामगार विरोधात अभियान विविध उपक्रमाचे आयोजन

बल्लारपूर :- बाल कामगार विरोधी दिनानिमित्त रेल्वे चाईल्ड लाईन बल्हारशाह, जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर, जिल्हा चाईल्ड लाईन चंद्रपूर, हृदया संस्था गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमान ने रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन कार्यक्रमात रेल्वे चाईल्ड लाईनचे संचालक फादर थॉमसन पुल्लेशेरी, चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक प्रवीण गाडवे, हृदया संस्था गडचिरोली चे संचालक काशीनाथ देवगडे, शशिकांत मोकाशे, आनंदराव मोहुर्ले, समन्वयक हृदयासंस्था, अभिषेक मोहुर्ले जिल्हा चाईल्ड लाईन चंद्रपूर, भास्कर ठाकूर रेल्वे चाईल्ड लाईन बल्हारशाह, अन्सार खान शासकीय रेल्वे पोलीस आदी मान्यवर उपस्थित होते .
रेल्वे स्टेशन परिसर व शहरात रैली काढण्यात आली. रेल्वे स्टेशन बल्हारशाह प्रबंधक रविद्र नंदनवार, प्रमोद रासकर सहायक पोलीस निरिक्षक, पोलीस स्टेशन बल्हारशाह, डॉ.गजानन मेश्राम वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर, सुनिल तुंगीळवार अ.क्र .तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर सहभागी झाले व बालमजुरी विरोधात स्वाक्षरी मोहीम घेऊन या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
या कार्याचा उद्देश बाल कामगारांना त्यांचे बाल वयात कामावर ठेवल्यामुळे त्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा येऊन त्यांचे बालपन हिरावले जाते. त्यामुळे त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होत नाही. परिणामत: बाल कामगारांचे वैयक्तीक, त्यांचे कुटुंबियांचे नुकसान होऊन देशाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. बाल कामगारांना त्यांचे बाल वयात काम करावे लागत असल्याने त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते व ते शिक्षणापासून वंचित राहतात, बाल वयातच कामाच्या ठिकाणी बालकांचे शोषण करण्यात येते. त्यामुळे त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने, हॉटेल, कारखाने, चित्रपटगृहे, गॅरेज आणि इतर ठिकाणी बाल अन् किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये असे केल्यास हा कायद्याने गुन्हा ठरेल, अशी माहिती अजय साखरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली.
‘‘१४ ते १८ वर्षे वयोगटातील बालकास धोकादायक नसलेल्या व्यवसाय आणि प्रक्रियेमध्ये अनुमती देण्यात आली आहे मात्र बाल आणि किशोरवयीन कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियमन १९८६ अन्वये १४ वर्षांखालील बालकास धोकादायक आणि विनाधोकादायक व्यवसाय प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करतांना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी महिती काशिनाथ देवगडे,संचालक हृदया संस्था यांनी दिली. बाल संरक्षण व त्यांचे कायदे या विषयी शिशीकांत मोकासे यांनी दिली. या कार्यकर्माचे संचालन व प्रास्तविक भास्कर ठाकूर समन्वयक रेल्वे चाईल्ड लाईन यांनी केले तर आभार अभिषेक मोहुर्ले, समन्वयक जिल्हा चाईल्ड लाईन यांनी मानले. या कार्यक्रमात संस्थानाचे पधाधिकारी उपस्थित होते.