Home Breaking News Chankarpur city@ news • चंद्रपूरात प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या

Chankarpur city@ news • चंद्रपूरात प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या

1470

Chankarpur city@ news
• चंद्रपूरात प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या

चंद्रपूर :- जिल्ह्यामध्ये सध्या गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलं आहे. ४८ तासात ३ हत्या करण्यात आल्या. या घटना ताज्या असतानाच आज पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या छोट्या नागपूर येथे प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन युवकाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली.विशाल अमर पाटील वय १७ वर्ष रा. घुटकाळा वार्ड, नेहरू शाळे जवळ चंद्रपूर असे मृतक युवकाचे नाव आहे. या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चार तासात २ आरोपीला अटक केली. अमन खान अहमद खान, रा. सिस्टर कॉलनी असे आरोपीचे नाव आहे तर एक अल्पवयीन युवक आहे.
विशाल परिसरातील एका मुलीवर प्रेम करत होता त्याच मुलीवर आरोपी सुद्धा प्रेम करत होता. यामुळे विशाल आणि आरोपीमध्ये वाद झाला. आरोपीने विशालचा काटा काढण्यासाठी त्याला समझोता करण्याच्या बहाण्याने पडोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या छोटा नागपूर येथे नेले व आपल्या एका मित्रासह विशालची हत्या केली.
आज दि. 18/05/2023 रोजी पोलीस स्टेशन पडोली येथे अप. क्र. 187 / 23 कलम 302 भांदवि अन्वये गुन्हा नोंद झाला असुन छोटा नागपुर रोड पाईप लाईन जवळ पटेल विटा भट्टी च्या मागील बाजूस पाईपलाईनकडे जाणा-या रस्त्याच्या बाजुला झुडपामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडुन आहे व त्या मृतदेहावर राखळ टाकुन आहे. अशी माहीती मिळाल्याने मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी सदर गुन्हयाचा छळा लावण्याकरीता वेगवेगळे पथक तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत मार्गदर्शक सुचना देवुन घटनास्थळावर रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक हे घटनास्थळावर पोहचुन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासाला सुरूवात करून गोपनीय माहिती काढुन अनोळखी मयत ईसमाची ओळख पटविली असता मयत इसम हा विशाल उर्फ विश्वास अमर पाटील, चंद्रपुर येथील असल्याचे निष्पन्न झाले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करून नमुद गुन्हयातील दोन आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, मृतक व दोन आरोपी हे शुक्रवारचे रात्रो अंदाजे 08:00 ते 8:30 चे दरम्यान पडोली येथे गेले असता, सदर ठिकाणी त्यांचेमध्ये वाद निर्माण होवुन भांडण झाल्याने आरोपीने मृतकाला मारहान करून खुन केला व मृतकाच्या शरीरावर जवळ असलेली राखळ टाकुन निघुन गेल्याची कबुली दिली.

सदर कामगीरी मा.पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा अपर पोलीस अधिक्षक चंदपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलीस निरीक्षक मडावी, पोउपनी विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पो.शि. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले यांनी केली.