Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात स्व. बाळु धानोरकर ला वाहिली सर्वपक्षीय...

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहरात स्व. बाळु धानोरकर ला वाहिली सर्वपक्षीय श्रद्धांजली

754

Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहरात स्व. बाळु धानोरकर ला वाहिली सर्वपक्षीय श्रद्धांजली

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार सुरेश उर्फ ​​बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी आकस्मिक निधन झाले होते. बाळू धानोरकर चा संसदीय कार्यकाळ आणि बल्लारपूर विधानसभा मतदार संघाशी असलेली विशेष ओढ यामुळे बल्लारपूर येथील त्यांच्या मित्रपरिवाराने १७ जून रोजी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. वस्ती विभाग येथील महात्मा गांधी पुतळा जवळ झालेल्या श्रध्दांजली सभेला बाळु धानोरकर यांची अर्धंगिनी, वरोरा क्षेत्र चे आमदार सौ.प्रतिभा धानोरकर, थोरले बंधू भद्रावती चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा काँग्रेस चे रामू तिवारी, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेल रझा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला विविध धर्मातील धर्मगुरू ने शांतीपाठ केले. शीख धर्माचे ग्यानी मिलोकसिंग, सनातन धर्माचे रामजी महाराज, मुस्लिम धर्माचे मौलाना हाफिज अबुबकर, ख्रिश्चन धर्माचे पास्टर श्याम मातंगी, बौद्ध धर्मातील श्रीमती आशा भाले आणि रेखा मेश्राम यांनी शांती संदेशाचे वाचन केले. यानंतर विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवक, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी शोक व्यक्त केला.
सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक व माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश खरबडे यांनी मनोगत व्यक्त केले. तद्नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू काबरा, शिवसेना (शिंदे गट) कमलेश शुक्ला , शिवसेना (ठाकरे गट) ॲड. प्रणय काकडे, आम आदमी पक्षाचे रवी पुप्पलवार, बी.आर.एस.चे संतोष बड़केलवार, रिपाईचे निरज वाळके, एमआययएम चे शाहीद शेख, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे वसंत मांढरे, इंटकचे विश्वास साळवे, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, श्रीराम बालक आखाडा आणि व्यापारी मंडळ, बल्लारपूरच्या वतीने रामधन सोमाणी, बल्लारपूर बीजनेस असो. चे रवींद्र फुलझेले, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि संत तुकाराम सेवा मंडळाच्या वतीने मनोहर माडेकर, जेबीबीएसचे संतोष बेताल, पत्रकार संघाचे वसंत खेडेकर, इंडियन मेडिकल असो. चे डॉ.रजनीताई हजारे, अमन पसंद कमिटीचे ताहेर हुसेन, जामा मस्जिद कमिटीचे शेख उस्मान आणि सिटू कामगार संघटनेच्या वतीने शेख जाहीद यांनी माजी खासदार स्व. बाळू धानोरकर प्रती शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली.

सर्वांचे मनोगत झाल्यानंतर वरोरा चे आमदार स्व. बाळू धानोरकर च्या पत्नी श्रीमती प्रतिमा धानोरकर यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर बोलावले असता, वातावरण निरागस झाले, अतिशय जड आवाजात श्रीमती धानोरकर यांनी बाळू धानोरकर चा राजकीय प्रवास आणि त्यांच्या शेवटच्या आजारा विषयी माहिती दिली. ते स्वतः बाळू धानोरकरची स्वप्ने सत्यात उतरविण्याबाबत बोलून कार्यकर्त्यांना खंबीरपणे कामाला लागा, असे सांगतानाच बाळू धानोरकर प्रमाणेच कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव राहणार असल्याची ग्वाही दिली. शेवटी श्रद्धांजली सभेत उपस्थित नागरिकांनी बाळू धानोरकर च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रास्ताविक घनश्याम मूलचंदानी यांनी केले तर संचालन अब्दुल करीम यांनी केले.