Home Breaking News Chandrapur dist@ news • मोदीजींच्या राजवटीत देशात औद्योगिक क्रांतीला सर्वाधीक गती...

Chandrapur dist@ news • मोदीजींच्या राजवटीत देशात औद्योगिक क्रांतीला सर्वाधीक गती :भुपेन्द्र यादव • ७५ वेकोलि भूमिपुत्रांना मान्यवरांच्या शुभहस्ते नोकऱ्यांचे आदेश प्रदान

133

Chandrapur dist@ news

• मोदीजींच्या राजवटीत देशात औद्योगिक क्रांतीला सर्वाधीक गती :भुपेन्द्र यादव

• ७५ वेकोलि भूमिपुत्रांना मान्यवरांच्या शुभहस्ते नोकऱ्यांचे आदेश प्रदान

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

चंद्रपूर :- गत ९ वर्षात औद्योगिक विकासात देशाने मोठी झेप घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ विकासाला वाहून घेणारा असल्याने उत्पादन लक्ष्यांक, रोजगार निर्मीती या बाबींवर भर दिला जात आहे. सरकारी, निमसरकारी व खासगी उद्योगांमध्ये उत्पादकते बरोबरच रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत नव्या औद्योगिक धोरणांमुळे उद्योग क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आश्वासक असल्याने या क्षेत्रात नवनवीन उद्योजक पुढे येत देशाच्या प्रगतीला हातभार लावण्याचा प्रयत्न होत आहे केंद्र सरकारचे धोरण उद्योग, व्यवसाय संरक्षक असल्याने औद्योगिक क्रांतिच्या दिशेने देशाची वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने, कामगार व रोजगार मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.
वेकोलि क्षेत्रीय कार्यालय, वणी उर्जाग्राम (ताडाळी) चंद्रपूर येथे मोदी / ९ अंतर्गत आयोजित केेंद्र सरकारी रोजगार मेळा अंतर्गत ७५ वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरी आदेश वितरण तथा लाभार्थी संमेलनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजक हंसराज अहीर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी वणी क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. संजय कुंटे, वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोजकुमार, कार्मिक निदेशक संजिवकुमार, क्षेत्रीय महाप्रबंधक आभा सिंह, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, विजय पिदूरकर, नामदेव डाहूले, राजू घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, पवन एकरे यांची उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनात भूपेंद्र यादव यांनी रोजगार प्राप्त सर्व भूमिपुत्रांना शुभेच्छा देतांनाच आपले कर्तव्य समजून उद्योगाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. देशाप्रतीचे आपले ऋण समर्पित भावनेने फेडावे, पर्यावरणास न्याय देण्याची उद्योगाबरोबरच आपली जबाबदारी असल्याची भावना नेहमी जागृत ठेवावी असे सांगतांनाच यापुर्वी पर्यावरणीयविषयक मान्यतेकरिता जवळपास २ वर्षाहुन अधिक कालावधी लागायाचा आता केवळ ७५ दिवसात पर्यावरणीय मान्यता दिली जाते. सर्व बाबींची पुर्तता एकाचवेळी व्हावी अशी व्यवस्था सरकारने केली आहे. वेकोलि प्रदुषण ७६ टक्के पेक्षा अधिक चिन्हीत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा कसोशिने प्रयत्न करावा अशी सूचना केली. कामगारांनी औद्योगिक प्रगतीकरीता कर्तव्य आधारीत कार्यावर भर देण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केले.

“केंद्राच्या विकासाभिमुख धोरणामुळेच कोळशाचे बंपर उत्पादन – हंसराज अहीर”

आपल्या संबोधनात हंसराज अहीर यांनी सांगितले की, प्रधानमंत्र्यांनी एम्पलायमेंट प्लेसमेंट आधारीत कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले असल्याने आज ७५ भूमीपुत्रांना त्यांच्या हक्काचा रोजगार दिला जातोय २०१५ पासून सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केल्याने नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. वेकोलि प्रकल्पग्रस्तांना १२० करोड ऐवजी २३०० करोड आर्थिक मोबदला व प्रकल्पग्रस्तांना ११ हजार नोकऱ्या मिळाल्या आहेत. शेतकरी बांधवांच्या त्यागाचा हा सन्मान आहे. सरकारच्या विधायक धोरणामुळे कोळश्याचे उत्पादन वाढले आहे. ७०० मिलीयन मे.टन पर्यंत उत्पादन होत आहे.
वेकोलि प्रकल्पामधील ओबीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे सांगत हंसराज अहीर यांनी स्थानिकांवर रोजगारविषयी होत असलेल्या अन्यायाबाबत चिंता व्यक्त करीत ओबी कंपन्या राज्य शासनाच्या ८०:२० धोरणाला हरताळ फासत श्रमीकांची भर्ती करीत आहेत. या कंपन्यांमध्ये बाहेरील कामगार स्थानिकांपेक्षा ३ पट अधिक असल्याने स्थानिकांवर अन्याय होत आहे. अत्यल्प मजुरी देत आर्थिक लूट सूरु आहे. वेकोलि अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. सरकारी धोरणावर अंमल व्हावा जे भुमीहिन आहेत, शेतमजुर आहेत त्यांना प्रबंधनांने ट्रेनिंग द्यावी. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना चंद्रपूर, यवतमाळ क्षेत्रात रोजगार उपल्बध होईल असा प्रयत्न करु उच्चशिक्षीत प्रकल्पग्रस्तांना सन्मानपूर्वक पद मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन अहीर यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले.