Home Breaking News Chandrapur dist@ news • तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी...

Chandrapur dist@ news • तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा:आ. किशोर जोरगेवार •आढावा बैठकिला सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,गट विकास अधिकारी आशुतोष सपकाल तहसिलदार विजय पवार यांची उपस्थिती!

248

Chandrapur dist@ news
• तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा:आ. किशोर जोरगेवार

•आढावा बैठकिला सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,गट विकास अधिकारी आशुतोष सपकाल तहसिलदार विजय पवार यांची उपस्थिती!

सुवर्ण भारत: किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आढावा चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवार ला) स्थानिक नियोजन भवनात घेण्यात आला.

या बैठकिला आमदार किशोर जोरगेवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा चंद्रपुरचे एसडीओ मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर नायब तहसिलदार राजू धांडे , मंडळ अधिकारी प्रविण वरभे , किशोर नवले , विनोद गणफाडे , यंग चांदा ब्रिगेडच्या संघटिका वंदना हातगांवकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि या आढावा सभेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आढावा सभा आयोजित करून तेथील नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते.त्यामुळे गरजू नागरिकांना 24 तासाच्या आत कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी” स्पेशल ड्राईव्ह “उपक्रम राबवावे. तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यक्तीला आवश्यक असणारी कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावी ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेअंतर्गत 29 विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदरहु विभागाच्या योजनांची एकत्रित माहिती पुस्तिका तयार करून पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर वितरित करावी, जेणेकरून, सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती मिळू शकेल. अशा सूचना आ. जोरगेवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. समस्या निकाली काढण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेण्यात येईल. विकास साधावयाचा असल्यास सर्वसामान्यांना योजनांचा लाभ देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. नागरिकांच्या काही समस्या व तक्रारी असल्यास त्याचे तातडीने निरसन करावे असेही ते म्हणाले.

सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, योजना आपल्या दारी पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी पोहोचले आहे. 75 वर्ष उलटूनही काही लोकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. पण शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्वसामान्य व गरजू नागरिकांना कागदपत्रासह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

ओळखपत्र तथा कागदपत्रा अभावी कोणीही लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य ती कारवाई करून योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून द्यावा.असे ते आपल्या भाषणात म्हणाले मला सुध्दा एकेकाळी तलाठ्यास पैसे देवून दाखला मिळवावा लागल्याची खंत त्यांनी आज भर सभेत व्यक्त केली. अधिकारी व कर्मचा-यांनी जनतेची कामे वेळीच करुन त्यांचा विश्वास संपादन करावा असे चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरुगानंथम एम. आपल्या भाषणात पुढे म्हणाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले ते म्हणाले कि शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हा मानस आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घटकापर्यंत योजना व त्यांची माहिती पोहोचावी यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सरपंच हा गावातील प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या माध्यमातून योजनांची माहिती गावात पोहोचविण्यास हातभार लागणार आहे. असे ही ते म्हणाले.

विविध योजनांचा आढावा

यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा सादर करण्यात आला.त्यात
पंचायत विभाग, कृषी ,आरोग्य, सिंचन ,बांधकाम, प्रधानमंत्री आवास, आदीं विभागांच्या योजनांची माहिती सादर करण्यात आली.
दरम्यान आजच्या या आढावा बैठकीत ग्रामीण स्तरावरील अनेक तक्रारींचा पाऊस पडला.
कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार तर उपस्थितीतांचे आभार कृषी अधिकारी हटवार यांनी मानले.