Home Breaking News Chandrapur city@ news • पदमापूर- चिंचोली येथील बनावट शेतजमीन विक्री प्रकरण! ...

Chandrapur city@ news • पदमापूर- चिंचोली येथील बनावट शेतजमीन विक्री प्रकरण! • आदिवासी महिलेची फसवणूक; दलालाचा प्रताप!आमदारांच्या आढावा बैठकीत पुंडलिकराव गोठेंची तक्रार दाखल! • तहसिलदारांनी मागितला पटवा-यास वस्तूनिष्ठ अहवाल.!

713

Chandrapur city@ news
• पदमापूर- चिंचोली येथील बनावट शेतजमीन विक्री प्रकरण!

• आदिवासी महिलेची फसवणूक; दलालाचा प्रताप!आमदारांच्या आढावा बैठकीत पुंडलिकराव गोठेंची तक्रार दाखल!

• तहसिलदारांनी मागितला पटवा-यास वस्तूनिष्ठ अहवाल.!

सुवर्ण भारत: किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: स्थानिक नियोजन भवन येथे काल शनिवारला चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण स्तरावरील एक आढावा बैठक पार पडली.या बैठकिला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, ग्राम पंचायतचे सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.काल उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीत ग्रामीण स्तरावरील कामांचा मुद्देसुद आढावा घेण्यात आला.

तदवतंच या बैठकित उपस्थित लोकांच्या तक्रारी स्विकारण्यात आल्या.तब्बल बारा वर्षांनंतर ही आढावा बैठक झाली त्यामुळे अनेकांनी या बैठकीत तक्रारींचा पाढा वाचला.सदरहु बैठकिला ग्राम सेवक हजर होते.परंतु चंद्रपूर तहसिल अंतर्गत येणाऱ्या साजांचा एकही पटवारी या बैठकिला उपस्थित असल्याचे दिसून आले नाही.मात्र मंडळाचे मंडळ अधिकारी प्रविण वरभे , किशोर नवले व विनोद गणफाडे हे आवर्जून उपस्थित होते.त्यामुळे आता पुढे होणा-या आढावा बैठकिला ग्रामसेवकांसह तलाठ्यांची आढावा बैठक आमदारांनी घ्यावी असा सुर अनेकांच्या मुखातून बाहेर पडला .

ग्रामीण भागातील शेत रस्ते अतिक्रमण व स्मशानभूमीची समस्या अनेक जण या बैठकित मांडतांना दिसून आले.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते पुंडलिकराव गोठे यांनी या आढावा बैठकीत चंद्रपूर तहसिल अंतर्गत येणाऱ्या पदमापूर साज्यातील चिंचोली येथील एका आदिवासी महिलेचे बनावट शेतजमीन विक्री प्रकरणा बाबत लेखी तक्रार नोंदवून उपस्थित आमदारांसह वरिष्ठ अधिकारी वर्गांचे लक्ष वेधले. याच अनुषंगाने महिलेची फसवणूक करणाऱ्या दलालावर पोलिस कारवाई करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली.भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत व लोकांची फसवणूक होणार नाही.या साठी अश्या दलालावर तातडीने कारवाई होणे आवश्यक व जरुरीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सर्वप्रथम हे बनवाट शेतजमीन विक्रीचे प्रकरण आप पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी उघडकिस आणले होते ‌.या बाबतीत त्यांनी सतत पाठपुरावा केला.

या साठी त्यांनी एक पत्रकार परिषद देखिल घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाकडे स्वतः पुंडलिक राव गोठे यांनी लक्ष पूरवून दोषी अधिकारी कर्मचारी व मुख्य सुत्रधार (दलाल )या वर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली .या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे महसूल आयुक्त , चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा , चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एसडीओ मुरुगानंथम एम. व तहसिलदार विजय पवार यांचे कडे या पूर्वीच रितसर तक्रार नोंदवली आहे. सदरहु प्रकरणाच्या संदर्भात चंद्रपूरचे तहसिलदार यांनी पटवारी पदमापूर तलाठ्याचा वस्तूनिष्ठ अहवाल मागितला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.चिंचोली बनावट शेतजमीन विक्री प्रकरणातील पटवारी अहवालाकडे आता सा-यांचे लक्ष वेधले आहे.