Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर शहारात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

Ballarpur city@ news • बल्लारपुर शहारात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

191

Ballarpur city@ news
• बल्लारपुर शहारात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :- लोकसमग्रह समाज सेवा संस्था, बल्लारपूर अंतर्गत संचालित प्रकल्प द्वारा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत कार्यकर्त्या साठी एक दिवशीय व्यक्तिमत्व विकास क्षमता बांधणी व मुल्यांकन प्रशिक्षण कार्यक्षाळेचे आयोजन लोकसमग्रह प्रशिक्षण हॉल, बल्लापूर तेथे २८ जून ला करण्यात आले होते.
या कार्य शाळेला अध्यक्ष संचालक फा.थॉमसन पुल्लेशेरी, फा.सबास्टीन सहसंचालक , भास्कर ठाकूर समन्वयक रेल्वे चाईल्ड लाईन, मधुकर गोपले, वर्षा दानव, समन्वयक जीवन महिला सक्षमीकर कृती कार्यक्रम, प्रदीप निरंजने, अकाउंट लोकसमग्रह संस्था, तर मार्गदर्शक मा. शेशिकांत मोकाशे, चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘’इतनी शक्ती हमे देना दाता” या सामुहिक प्रार्थना गीताने करण्यात आले. मागील सभा चे वाचन आचल कांबळे यांनी केले. त्यांनंतर अजय तिरनकर यांनी जीवन भाग – ३ महिला सक्षमीकर कृती कार्यक्रम चा आहवाल सादर केले. अतुल मडावी यांनी रेल्वे चाईल्ड लाईन बल्हारशाह चे अहवाल सादर केला. भास्कर ठाकूर यांनी The Good Shephard प्रकल्पाचा अहवाल सादरीकरन केले. मधुकार गोपले यांनी अदिवासीचे आरोग्य व उपजीविका समुदाय विकास प्रकल्प याच्या विषयी माहिती सादर केले.

जानवी महेश्कर अकाउंट प्रक्रिया या विषयी माहिती दिली. मार्गदर्शक शशिकांत मोकाशे, चंद्रपूर यांनी कार्यकर्ता क्षमता बांधणी व विविध विभागाच्या शासकीय योजना त्यांना लागणारी दस्तावेज या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष फा.थॉमसन यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कोणतेही कार्य करीत असताना सकारात्मक विचार असावे त्यामुळे आपल्याला सकारत्मक उर्जा मिळतो.
सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन करून प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात आले. या बैठकीके सूत्र संचालन सुरेंद्र धोडरे यांनी केले तर प्रास्तविक भास्कर ठाकूर यांनी केले. आभार विजय अमर्थराज यांनी मानले. या बैठकीला गडचिरोली चंद्रपूर येथील कार्यकर्ते उपस्थित होते.