Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर पेपर मिल मधील कोरोना काळात मुत्युमुखी...

Ballarpur city@ news • बल्लारपूर पेपर मिल मधील कोरोना काळात मुत्युमुखी कायम व कंत्राटी कामगारांना सहाय्यता राशी देण्यात आली. • मजदूर यूनियन अध्यक्ष व माजी खा.नरेश पुगलिया यांनी पेपर मिल व्यवस्थापनशी केली होती मांगनी

715

Ballarpur city@ news
• बल्लारपूर पेपर मिल मधील कोरोना काळात मुत्युमुखी कायम व कंत्राटी कामगारांना सहाय्यता राशी देण्यात आली.

• मजदूर यूनियन अध्यक्ष व माजी खा.नरेश पुगलिया यांनी पेपर मिल व्यवस्थापनशी केली होती मांगनी

✍️ संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर: कोरोनाच्या काळातील दुसरी लाट (कोविड-१९) या शतकातील सर्वात मोठी महामारी ठरली. या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला होता. या साथीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. याचे गांभीर्य पाहून बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खा.नरेश पुगलिया यांनी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाशी संवाद साधला आणि बांधलेल्या बल्लारपूर मध्ये कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन
युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेत कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांना अडीच लाख आणि कायम कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याचे ठरले.
या साथीच्या काळात कंत्राटी कामगार स्व.सुभाष सिन्हा, शेख रज्जाक, रूपेश शर्मा यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २.५ लाख आणि स्थायी कामगार अमित मुथा, हरेंद्र रॉय, विजय साळवे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये धनादेश देण्यात आले.
व्यवस्थापनाच्या वतीने मानव संसाधन डी.जी.एम अजय दुरगकर युनियनच्या वतीने तारासिंग कलसी, वसंत मांढरे, रामदास वागदरकर,कृष्णन नायर, वीरेंद्र आर्य, सुदर्शन पुली, गजानन दिवसे, आशिष मोहता उपस्थित होते.