Home Breaking News Ghugus city @news • जिवणे परिवाराने आईचा स्मृतीशेष तसेच सेवानिवृत्त दिवस न...

Ghugus city @news • जिवणे परिवाराने आईचा स्मृतीशेष तसेच सेवानिवृत्त दिवस न करता बौद्ध विहार बांधकामास पन्नास (५०) हजार दान

429

Ghugus city @news
• जिवणे परिवाराने आईचा स्मृतीशेष तसेच सेवानिवृत्त दिवस न करता बौद्ध विहार बांधकामास पन्नास (५०) हजार दान
✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

घुग्घुस: भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस चे सल्लागार तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन जिवणे व त्यांचा कुटुंबीयांनी स्मृतीशेष अंजनाबाई भाऊराव जिवणे यांच्या पाचवा (५) वर्षाचा दिवस न करता व माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन जिवणे यांनी वेकोली मधुन सेवानिवृत्त कार्यक्रम न करता विहाराला (५०) पन्नास हजार दान दिले.

जनार्दन जीवने वेकोली सेवानियुक्त झाल्याबद्दल यांचे भारतीय बौद्ध महसभा सदस्यांनी तसेच यशोधरा महिला मंडळातर्फे शाल व पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन जिवणे यांनी वेकोली कामावरून सेवानिवृत्त होण्यापूर्वी पंधरा (१५) हजार धम्म दान केले,सेवानिवृत्त झाल्यावर समाजबांधवांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
एकूण जिवणे परिवारांनी आतापर्यंत पाहष्ठ (६५०००) हजार नवनिर्मित भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस विहार बांधकामास दान दिले.

जनार्दन जिवणे परिवारांनी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस, तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस, व अनेक लहान, मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात व्यर्थ पैसा खर्च करतो आणी त्यामधून साध्य काहीच होत नाही.
म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैसांचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल.

यावेळी विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे,कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे,सल्लागार संभाजी पाटिल,कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे,विजय कवाड़े, जयंत निखाड़े, यशोधरा महिला मंडळाचे अध्यक्ष रीताताई देशकर, गुडदेताई,सन्माननीय जनार्दन जीवने,त्यांच्यी पत्नी रजनीताई जीवने,त्यांच्या मुलगा शंतनू जीवने व समाज बांधव उपस्थित होते.