Home Breaking News Ballarpur city @news • बाल सहायता गटाची आढावा बैठक संपन्न

Ballarpur city @news • बाल सहायता गटाची आढावा बैठक संपन्न

387

Ballarpur city @news
• बाल सहायता गटाची आढावा बैठक संपन्न

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

बल्लारपूर :- 5 जुलै रोजी रवींद्र नंदनवार, रेल स्टेशन व्यवस्थापक, बल्हारशाह यांनी भारतीय रेल्वेच्या संपर्कात येणाऱ्या मुलांची काळजी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुधारित मानक कार्यप्रणाली वर मासिक बैठक चे आयोजन वीआयपी हॉल रेल्वे स्टेशन येथे केले होते.
या बैठकीला उपस्थित रवींद्र नंदनवार, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक, बल्हारशाह, एस.के. पाठक, वरिष्ठ आर.पी.एफ. निरीक्षक, रेल्वे स्टेशन, बल्हारशाह, ॲड. क्षमा बासरकर अध्यक्षा बालकल्याण समिती चंद्रपूर, अ‍ॅड. अमृता वाघ, सदस्य बाल कल्याण समिती, सौ. वनिता घुमे, सदस्य बाल कल्याण समिती, डॉ. ज्योत्स्ना मोहितकर, सदस्य बाल कल्याण समिती, प्रीती उंदिरवाडे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूर, रमेश आर. शेंद्रे, मुख्य तिकीट निरीक्षक, देवानंद मंडलवार, जीआरपी हवालदार रेल्वे स्टेशन बल्हारशाह, रेल्वे चाइल्ड लाईन चे समन्वयक भास्कर ठाकूर, त्रिवेणी हाडके काउन्सिलर सहित रेल्वे चाइल्ड लाईन टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्रिवेणी हाडके यांनी जून मध्ये झालेल्या बाल सहायता गटाच्या बैठकीचा अहवाल वाचून दाखवला. रेल्वे चाइल्ड लाईनचे समन्वयक भास्कर ठाकूर यांनी रेल्वे चाईल्ड लाईनने जून 2023 महिन्या पर्यंत केलेल्या कामाचा अहवाल सादर केला. 13 जून पी .एस. खैरकर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांनी भारतीय रेल्वेच्या संपर्कात येणाऱ्या मुलांची काळजी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुधारित मानक कार्यप्रणाली वरील बैठकीचे इतिवृत्त सांगण्यात आले.
जून महिन्यात एकूण 18, मुले 9, मुली बालकल्याण समितीसमोर सादर केले आणि आढळलेल्या मुलांच्या मूल्यमापनाची माहिती देण्यात आली आणि खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
रेल्वे, आरपीएफ, जीआरपी द्वारे पाळल्या जाणार्‍या ऑपरेशनल सूचना;बाल समर्थन गटाची कर्तव्ये आणि बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण युनिट, चाइल्ड हेल्प डेस्क टीम यांचे कार्य; ट्रेन रेल्वे परिसरात आढळणाऱ्या मुलांची काळजी घेण्याची प्रक्रिया; चाइल्ड लाईन प्रतिनिधी आणि बाल मदत गटासह रेल्वे संरक्षण दल, नागपूर द्वारे दर महिन्याला जागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे सुनिश्चित केले. चाइल्ड हेल्प डेस्क ग्रुपचे अधिकारी ट्रेनच्या आगमनावर आणि स्टेशनच्या परिसरात विशेष लक्ष ठेवून, 18 वर्षाखालील मुले जी घरातून पळून गेली आहेत किंवा संशयास्पद स्थितीत सापडली आहेत, त्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई करणे. चाइल्ड हेल्प डेस्कच्या समस्या आदी विषयावर चर्चा करण्यात आले.
बबिता लोहकरे यांनी संचालन केले तर विजय अमरथराज यांनी आभार मानले.