Home Breaking News Chandrapur city@ news • चिरोली येथे विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

Chandrapur city@ news • चिरोली येथे विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

942

Chandrapur city@ news
• चिरोली येथे विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

✍️ संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :- मुल तालुक्यातील चिरीली येथे 3 जुलै ला फातिमा शेख सार्वजनिक वाचनालय येथे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.

स्टूडेंट केअर असोसिएशन नागपूर यांच्या सौजन्याने चिरोली येथे वर्ग 10 वी आणि 12 वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महात्मा फुले विद्यालय चिरोली चे विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक विजय मुसळे लेखक करिअरवाला चंद्रपूर, डॉ. राकेश गावतुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी दिपक जोगदंड, वनकर, रोहित निकूरे, शिक्षक सम्रित उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, आयटीआय, सैन्य भरती, तांत्रिक शिक्षण, उच्च शिक्षण, केंद्रीय शिक्षण व स्पर्धा परीक्षा चे मार्गदर्शन केले.

स्टूडेंट केअर असोसिएशन नागपूर
कडून विजय मुसळे यांच्या हस्ते करिअरवाला पुस्तक फुले शाहू आंबेडकर वाचनालय केळझर व फातिमा शेख चिरोली वाचनालयाला पुस्तकभेट देण्यात आले.