Home Breaking News ▪️विशेष लेख ▪️ ◻️◻️वसंत बहरला ◻️◻️

▪️विशेष लेख ▪️ ◻️◻️वसंत बहरला ◻️◻️

372

▪️विशेष लेख ▪️

◻️◻️वसंत बहरला ◻️◻️

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

“अवघी अवनी सजली धुंद मोहरली”
“पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली …..”
नवलाईने नववधूच्या रुपात सजलेली वसुंधरा आणि यौवनात आलेला निसर्ग पहिला की वसंत ऋतू बहरल्याची जाणिव होते.रात्रीच्या वेळी मत्रमुग्ध करणारी जाई जुई,निशिगंध,पारिजातक पहिला की मन कस मोहीत होत आणि नकळत गुणगुणल्या जाते..’

“मन क्यू बहका रे बहका आधी रात को….'”

वसंत म्हणजे रसरसते लावण्य… वसंत म्हणजे चिरतरुण यौवन , आपल्या मोहक सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ पाडणारा असा हा वसंत सर्व ऋतूंचा राजा.
वसंत बहरला की दाट झाडीतून कोकिळेची गोड सुरेल साद मनाला भुरळ घालते.ऐटित पांढऱ्या फुलांची शॉल पांघरून सुगंध दरवळला उभा असलेला मोगरा, लाजरीबुजरी फुलांनी डवरलेली शेवंती, सर्वावर हुकूम करणारा आणि साम्राज्याचा तुरा रोवलेला विविधरंगी गुलाब , दाही दिशात सुगंध दरळवणारा निशीगंध, चाफा,कुंदा, लाडिवाळपणे आपल्या बाळांना कडेवर घेऊन उभा असलेला फणस, झुडपातून डोकावणारी करवंदे, हिरव्या कैऱ्या म्हणजे वसंत ऋतूने आपल्यावर आनंदाची, नवं चैतन्याची भरभरून केलेली उधळण म्हंटल तरी चालेल.
असा हा वसंत बहरलेला पाहिलं की

‘फुलूनिया येते ही बावरी तनू… वाट इथे स्वप्नातील संपते जणू….’

◻️▪️वैशाली राऊत ▪️◻️सहज सुचलं काव्यकुंज सदस्य ,नागपूर