Home Breaking News काव्यकुंज ♦️ सावळा श्रावण

काव्यकुंज ♦️ सावळा श्रावण

454

काव्यकुंज ♦️ सावळा श्रावण

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◻️▪️आला श्रावण सावळा आला
ऊन सरले नभ भरले
मन आनंदाने मोहरले
क्षणभर दु.ख हे विसरले
आला श्रावण सावळा आला
वसुंधरा हि सजली
नववधू परी हि नटली
शालू हिरवा ती हो ल्याली
आला श्रावण सावळा आला
सण उत्सवाने नटला
नवचैतन्य दे सगळ्या
आनंद बहू हा झाला
आला श्रावण सावळा आला
मन दुखरे हे हसले
ते आनंदाने बहरले
इंद्रधनू नभी ते दिसले
पाहुनी भान हरपले
आला श्रावण सावळा आला

♦️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
◻️◻️◻️जिल्हा –ठाणे◻️