Home Breaking News Gondpipri taluka@ news •तिन चिमुकल्यांचा तोहोगाव लगतच्या वर्धा नदीत बुडून दुर्दैवी अंत...

Gondpipri taluka@ news •तिन चिमुकल्यांचा तोहोगाव लगतच्या वर्धा नदीत बुडून दुर्दैवी अंत •मासे पकडणे जीवावर बेतले,तोहोगाव परिसरात शोककळा

350

Gondpipri taluka@ news
•तिन चिमुकल्यांचा तोहोगाव लगतच्या वर्धा नदीत बुडून दुर्दैवी अंत
•मासे पकडणे जीवावर बेतले,तोहोगाव परिसरात शोककळा

✍️विनोद पाल
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,गोंडपिपरी

गोंडपिपरी:गावालगत असलेल्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर मासे पकडण्यासाठी गेलेले चार पैकी तीन मुले बुडाल्याची घटना तालुक्यातील तोहोगाव येथे शनिवारी (८ जुलै) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून एक जण बचावल्याने ही घटना उघडीस आली.माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली यात रविवारी तिघांचेही मृतदेह हाती लागल्याने कुटुंबांनी टाहो फोडला.

सोनल सुरेश रायपूरे (११), निर्दोष ईश्वर रंगारी (११) आणि प्रतीक नेताजी जूनघरे (१३) अशी नदीत बुडालेल्या मृतकांची नावे आहेत. नुकतेच नवीन शैक्षनिक वर्ष सुरू झाले असून शनिवारला सकाळची आणि रविवार मुलांना सुट्टी असते.त्यामुळे शनिवारी शाळेतून घरी परतल्या नंतर दुपारच्या सुमारास तोहोगाव येथील प्रतीक,निर्दोष,सोनल आणि आरूष प्रकाश चांदेकर (११) हे मासे पकडण्याचे जाळे घेऊन लगतच्या वर्धा नदीच्या सिंधी घाटावर गेले.परंतु नदीचा प्रवाह वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने सोनल,निर्दोष,प्रतीक असे तिघे जण बुडाले आणि आरुष हा काठावर उभा असल्याने तो बचावला.सोबतचे मित्र पाण्यात बुडाल्याने त्याने घराकडे धाव घेतली आणि गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला.माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली दरम्यान विरुर,लाठी,कोठारी पोलिसांचा ताफा घटनस्थळी पोहचला व शोधमोहीम सुरू केली.घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी तहसील कार्यालयाचे नवनियुक्त तहसीलदार शुभम कदम तात्काळ हजर झाले अन् बचाव पथकाला पाचारण सुद्धा करण्यात आले परंतु शनिवारी रात्री पर्यंत मृतदेह शोधण्यास यश आले नाही.आणि रविवारला सकाळी एक आणि दुपारला दोन मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबांनी टाहो फोडला.मनाला हेलावून टाकणारी दुःखद घटना घडल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारी सुद्धा ही मुले नदीवर खेकडे पकडायला गेले होते परंतु पाण्याची पातळी कमी होती.रात्रभर संततधार पाऊस आल्याने वर्धा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली व त्याचा अंदाज या चिमुकल्या बालकांना आला नाही त्यामुळे हा अनुचित प्रकार घडला.हे सर्व मुले तोहोगाव येथील उच्च प्राथमिक शाळेचे विद्यार्थी असून ५ ते ७ वर्गात शिकत होते.सुट्टीच्या दिवशी मासे पकडायला जाणे त्यांच्या जीवावर चांगलेच बेतले आणि दुर्दैवी घटना घडली.