Home Breaking News Pombhurna@ taluka news • पोभुर्णा तालुक्यात चुलत पुतण्या ने मोठ्या आईस...

Pombhurna@ taluka news • पोभुर्णा तालुक्यात चुलत पुतण्या ने मोठ्या आईस दगडाने ठेचून हत्या केली.

527

Pombhurna@ taluka news

• पोभुर्णा तालुक्यात चुलत पुतण्या ने मोठ्या आईस दगडाने ठेचून हत्या केली.

पोंभुर्णा :- पोलीस स्टेशन पोंभुर्णा अंर्तगत मौजा सोनापुर येथील २७ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार नोंदविली की. १० जुलै २०२३ रोजी ११:०० वाजता सुमारास आपल्या शेतात निंदनी करण्यासाठी गावातील इतर दोन महिला सोबत जावुन दुपारी २:३० वा. सुमारास घरी परत येत असतांना तिचा चुलत दिर धिरज ठेंगणे यांच्या घरा जवळ आली. तेव्हा धिरज ठेंगणे तिचा हात पकडुन तिला जबरदस्तीने आपले गोठयाकडे नेवुन तिला २० हजार रू. दे नाहीतर तुझा रेप करतो. म्हणुन तिचेशी जबरदस्ती करु लागल्याने फिर्यादीने घाबरुन तिला पैसे देण्याचे कबुल केले. तेंव्हा आरोपीने तिला जर तु पैसे आणुन दिले नाही. तर तुला व तुझ्या पोराला मारून टाकतो. म्हणुन फिर्यादीचा मोबाईल आपले जवळ ठेवला. तेंव्हा फिर्यादीने कशीबशी आपली सुटका करून घरी आली व घरी हजर असलेली तिची सासु पुष्पा मधुकर ठेंगणे हिला धिरज रविद्र ठेंगणे याने तिच्या सोबत केलेल्या वरील घटनेबाबत सांगितले. असता सासु पुष्पा ठेंगणे हिने मी आता त्याच्याकडे जातो व त्यास जाब विचारून तुझा मोबाईल त्याच्या कडुन मागुन आणतो. म्हणुन गेली परंतु बराच वेळा पर्यंत घरी परत न आल्याने फिर्यादीने तिच्या पतीला दुसऱ्याचे मोबाईलने फोन करुन घरी बोलावुन सर्व हकिकत सांगितल्याने तिचा पती हा धिरज ठेंगणे याच्या घरा जवळ जावुन थोडयात वेळाने परत येवुन सांगितले की, आईचा धिऱ्याने मर्डर केला, आईला खाताचे खडयात टाकुन आहे. असे सांगितले वरुन फिर्यादी पुन्हा पती सोबत सदर ठिकाणी जावुन पाहिले असता सासु पुष्पा मधुकर ठेंगणे ही खाताचे खडयातील जमा असलेल्या पाण्यात मृतावस्थेत मिळुन आली. फिर्यादींचा चुलत दिर धिरज रविंद्र ठेंगणे (२०) याने फिर्यादीची सासु पुष्पा मधुकर ठेंगणे हिला कोणत्यातरी दगडाने कपाळावर, नाका-तोंडावर मारुन तिचा खुन केला.

अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे आरोपीविरुध्द कलम ३०२, ३५४, ३५४ (ब), ३२९, २०१, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी घटनेनंतर जंगलात फरार झाल्याने पो.स्टे. पोंभुर्णा येथील ठाणेदार सपोनि मनोज गदादे व स्टॉफ, उपपोस्टे उमरी पोतदार येथील ठाणेदार सपोनि किशोर शेरकी व स्टॉफ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि महेश कोंडवार व स्टॉफ यांनी आरोपीचा कसोशीने शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आहे.

गुन्हयाचे घटनास्थळ अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु तसेच मल्लीका अर्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल यांनी भेट दिली असुन त्यांच्या आणि पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.