Home Breaking News Bhadravati taluka@ news • कर्मचाऱ्यावर अन्याय खपवून घेणार नाही ...

Bhadravati taluka@ news • कर्मचाऱ्यावर अन्याय खपवून घेणार नाही कॉमरेड राजू गैनवार

118

Bhadravati taluka@ news

• कर्मचाऱ्यावर अन्याय खपवून घेणार नाही कॉमरेड राजू गैनवार

✍️ मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:येथील नुकतेच सवर्ग विकास अधिकारी बी.डी.ओ पंचायत समिती कार्यालय भद्रावती यांना निवेदन देण्यात आले आहे सुगंधा पेंदाम ही जिल्हा परिषद चरुर
धरापुरे ता. भद्रावती या शाळे मध्ये सन दोन हजार तीन पासून काम करीत आहे ज्या वेळेस कोणी शाळेत खिचडी शिकविण्याचे काम करण्यास तयार नव्हते व पन्नास पैशा पासून ही ऐकती बाई शालेय पोषण

आहाराचे काम करीत आहे आणि या शाळे मध्ये सव्वीस विद्यार्थी शिकत होते म्हणून दोन कर्मचारी ऐक स्वयंपाकीण ऐक मदतनीस म्हणून काम करीत होते परंतु आता चोवीस विद्यार्थी शाळे आहेत शाळेच्या व्यवस्थापन समिती व शाळेचे शिक्षक यांनी संगनमत करून हिला कामावरून कमी करण्याचे कट रचत आहे
या आशयाचे निवेदन कॉमरेड राजू गैनवार कामगार नेते माजी नगरसेवक जिल्हा संघटक आयटक व जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या नेतृत्वात सवर्ग विकास अधिकारी बी.डी.ओ यांना देण्यात आले या शाळे मध्ये कोणतेही कर्मचारी
बाई काम करण्यास तयार नव्हती संकटाच्या वेळी कोरोना काळात ही बाई आपल्या शाळेत काम केलेले आहेत सुगंधा पेंदाम ही स्वयंपाकीण म्हणून बरेच वर्ष काम केलेले आहे परंतु रेकॉर्डवर मुख्याध्यापकांनी मदतनीस अशी नोंद केलेली आहे व दुसरी स्वयंपाकीण नामे ज्योती पेंदाम ही चरुर धारापुरे येथे वास्तव्यास रहिवासी नाही ही चांडणखेडा येथील रहिवासी आहे ही शाळेत कधी येते तर कधी येत नाही आणि व चांडणखेडा येथून येणे जाणे करीत आहे ही बाई नव्याने लागली आहे तिला कामावरून काढावे जुनी बाई आहे तिला कायम कामावर ठेवावे अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक तर्फे तीव्र क्रांतिकारी आदोलन करण्यात येईल असा इशारा कॉमरेड राजू गैनवार यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर कॉमरेड विनोद झोडगे कामगार नेते राज्य सचिव आयटक.व जिल्हा अध्यक्ष शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चंद्रपूर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भद्रावती यांना देण्यात आले
निवेदन देते वेळी कॉमरेड नसरीन पठाण तालुका सचिव कॉमरेड शाया मोहितकर तालुका अध्यक्ष.कॉमरेड माला गायकवाड. कॉमरेड रेखा टोंगे. कॉमरेड आशा घाटे इत्यादी पदाधिकारी सदस्य कर्मचारी उपस्थित होते