Bhadrawati taluka@ news.
• खाजगी प्रवासी वाहनांना ऑनलाईन पद्धतीने परमिट ची व्यवस्था करा-खाजगी प्रवासी वाहन चालक
• खाजगी प्रवासी वाहतूक वाहनास ऑनलाईन परमीट ची व्यवस्था करा
• उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, यांच्या समोर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी खाजगी प्रवासी वाहन चालकांच्या मांडल्या समस्या
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती : सर्व खाजगी प्रवासी वाहतूक वाहनास भारतात कोठेही प्रवास करायचा असल्यास स्पेशल परमीट ची आवश्यकता असते तसा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा नियम आहे. हे परमीट मिळविण्यासाठी सध्या जिल्ह्यातील सर्व गाडी मालकास चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयात येवुन परमीट काढावे लागते. हे परमीट मिळविण्यासाठी संपुर्ण दिवस कार्यालयात जातो शिवाय परमीट साठी एजंटला जास्तीची रक्कम देऊन परमीट काढावे लागते. ही रक्कम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ठरविलेल्या फी पेक्षा दुपटीने आहे. त्यामुळे एजंट कडून सर्व गाडी धारकांची आर्थिक लुट होत आहे. तसेत अचानक एखादी भाड आलं तर परमीट काढु शकत नाही. त्यामुळे गाडी ट्राफिक पोलिसांकडून चॅलन होते किवा त्यांना सुध्दा मोठी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहतूक वाहन धारकांनी काय कराव? असा प्रश्न पडला आहे.
जेव्हा वाहन ऑनलाईन केले तर जिल्ह्यातील वाहनास ऑनलाईन परमीट देण्यास का थांबविलं जाते ? हे परमीट काढण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील वाहन धारकांना चंद्रपूर येथे यावे लागते. शिवाय येण्याजाण्याचा खर्च वेगळाच.
जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परमीट ऑनलाईन स्वरूपात सहजतेने मिळविता यावा, जेणेकरून जिल्हाभरातील खाजगी वाहन धारकांना होत असलेला नाहक त्रास व वेळेचा अपव्यय टळेल अशी मागणी घेऊन जिल्ह्यातील खाजगी वाहतूक वाहन चालक/मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
याच संदर्भात देवराव भोंगळे यांनी सोमवारी चंद्रपूर येथील उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, यांचे सोबत एक सर्व खाजगी प्रवासी वाहन धारकांची बैठक आयोजित केली. या बैठकीत देवराव भोंगळे यांनी वाहन धारकांच्या समस्यांचा पाढा वाचला. परमिट काढत असताना येणाऱ्या अडचणी याबद्दल माहीती दिली. किरण मोरे यांनी परमीट बद्दल सविस्तर माहिती देत होणाऱ्या समस्यांचे शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आस्वासन दिले.
यावेळी, प्रविण चिमुरकर, रतन सुकारे, गणेश राऊत, विनोद उपगन्लावार, आशीष कोटकर, सचिन बुरेले, भुषण कपीले, दिनेश शर्मा, प्रवीन छत्री, विशाल गुजर, निलेश गुजर, सुनिल फुंड, पवन हुरकट, प्रशांत येलेकर, योगेश गाडगे, नाना दिवटे, प्रदिप मोहितकर आणि इतर खाजगी प्रवासी वाहन धारक उपस्थित होते.