Home Breaking News Bhadrawati taluka @ news. • मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करा :...

Bhadrawati taluka @ news. • मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करा : भाकपाचे मुख्याधिकारी यांना निवेदन

169

Bhadrawati taluka @ news.

• मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करा : भाकपाचे मुख्याधिकारी यांना निवेदन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती : शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.यावर आळा घालण्याकरिता नगरपरिषदेने कुत्र्याचे निर्बीजीकरण करावे. अशा यशाचे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना दिले.
पीपल फॉर ॲनिमल या योजनेअंतर्गत प्राण्यांना संरक्षण देण्यात आले. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रो आणि पहाटेचे वेळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे. तसेच रात्रो वेळी-अवेळी रुग्णालयात जाणारे आजारी व्यक्ती आणि त्यांचे मित्र व नातेवाईक, बाहेर गावावरून येणारे प्रवासी नागरिक अत्यंत दहशतीत आहे.आतापर्यंत शहरातील अनेक लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. मोकाट कुत्रे दुचाकी स्वारांवर धावून जातात त्यामुळे अपघात होतो.

या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता नगर परिषदेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांची संख्या नियंत्रण ठेवावी. अशा आशयाचे निवेदन भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना दिले. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याकरीता नगरपरिषद निर्बीजीकरण करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधत असल्याचे सांगून हे काम लवकरात लवकर करण्यात येईल. नागरिकांच्या जीविताला प्रथम प्राधान्य दिल्या जाईल. असे डॉ.विशाखा शेळकी यांनी सांगितले.